![]()
अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक रामदास कडू यांची बिनविरोध निवड झाली आहे. ही निवडणूक सोमवारी, २६ ऑक्टोबर रोजी बँकेच्या सभागृहात पार पडली. सहकार विभागाचे सहायक निबंधक अनिरुद्ध राऊत यांनी ही निवड घोषित केली. ही निवडणूक बिनविरोध होण्यामागे पाच वर्षांपूर्वी झालेला एक करार होता. सार्वत्रिक निवडणुकीवेळी शिक्षक संघटनांमध्ये ठरले होते की, प्रत्येक संघटनेला एक उपाध्यक्षपद मिळेल आणि शिक्षक समितीला पाचही वर्षे अध्यक्षपद मिळेल. कडू हे या पंचवार्षिक टर्ममधील पाचवे उपाध्यक्ष आहेत. निवड घोषित होताच कडू यांनी मावळते उपाध्यक्ष सुरेंद्र मेटे यांच्याकडून पदभार स्वीकारला. बँकेचे अध्यक्ष गोकुळदास राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड बैठक झाली. यावेळी मावळते उपाध्यक्ष सुरेंद्र मेटे यांच्यासह अनेक संचालक उपस्थित होते. बँकेच्या संचालक मंडळाचा पदभार २०२७ मध्ये संपुष्टात येत आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीकडे जिल्ह्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
Source link
अमरावती शिक्षक बँकेच्या उपाध्यक्षपदी रामदास कडू बिनविरोध निवड:पाच वर्षांपूर्वीच्या करारानुसार झाली निवड; मेटेंकडून पदभार स्वीकारला