![]()
तालुक्यातील विहामांडवा ते नवगावदरम्यानच्या परिसरात उसाच्या शेतांना अचानक भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. यात ३० शेतकऱ्यांचा १०० एकरांहून अधिक क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाला असून, मोसंबीच्या बागांसह इतर पिकेही आगीच्या
.
विहामांडवा ते नवगावदरम्यान चार ते पाच किलोमीटरच्या परिसरात आगीचे लोळ दिसत होते. उसाचे पीक आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. सुरेश घुले, नवनाथ दगडखैर, बाजीराव दगडखैर, हिम्मत दगडखैर, मुन्शी शेख, संजय लसघरे, गणेश पिंगळे, नकुल राक्षे, ज्ञानदेव दगडखैर, विष्णू फुंदे, अंकुश सुराशे, समद शेख यांच्यासह आणखी काही शेतकऱ्यांचा ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याचे पंचनाम्यामध्ये नमूद केले आहे. विहामांडवा ते नवगावदरम्यानच्या शिवारात आगीचे लोळ दिसल्याने तिकडे धावत जाऊन पाहणी केली असता भीषण आग लागल्याचे दिसले. तोडणीस आलेला ऊस जळत असल्याचे पाहून डोळ्यात पाणी आले. इतर शेतकऱ्यांना माहिती दिल्याने सर्वजण घटनास्थळाकडे आले. पाणी नसल्याने आग आटोक्यात आणण्यास उशीर झाला. – केशव कोल्हे, शेतकरी, विहामांडवा या आगीने रौद्र रूप धारण केले होते. विहामांडवा- नवगावदरम्यान चार ते पाच किलोमीटरच्या अथांग परिसरात केवळ आगीच्या ज्वाला आणि धुराचे प्रचंड लोळ दिसत होते. ऐन तोडणीच्या काळातच उसाचे पीक डोळ्यांदेखत जळाल्याने तोंडचे पाणी पळाले आहे. परिसरातील जायकवाडीचा कालवा बंद असल्याने आग नियंत्रणासाठी पाणी उपलब्धतेत अडचणी आल्या. जर वेळेवर कालव्यातून पाणी उपलब्ध झाले असते, तर आगीवर नियंत्रण मिळवून नुकसान टाळता आले असते, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. Ãनवगाव व विहामांडवा शिवारातील नुकसानग्रस्तांचा ऊस विहामांडवा येथील श्री रेणुकादेवी-शरद साखर कारखाना गाळपासाठी नेणार आहे. बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. – विलास भुमरे, आमदार, पैठण
फोन करून शेतकऱ्यांना बोलावले
बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळण्यासाठी प्रयत्न
कालवा बंद असल्याने आग नियंत्रण करण्यात अडथळे