Headlines

ग्रामसेविका कधी येणार? फलक लावण्याची ग्रामस्थांकडून मागणी:शेळावे ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक कमालीचे त्रस्त



शेळावे बु. ता. पारोळा येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. संबंधित ग्रामसेविकेकडे दुसऱ्या गावाचा अतिरिक्त कार्यभार असल्याने, त्या शेळावे बुद्रुक ग्रामपंचायतीत नेमक्या कोण-कोणत्या वारी आणि किती ते किती वेळे

.

शासकीय नियमांनुसार, ज्या अधिकाऱ्यांकडे दोन गावांचा कारभार असतो, त्यांनी कोणत्या गावात कधी उपलब्ध असणार याचे वार निश्चित करून तसा फलक लावणे बंधनकारक आहे. सामान्यतः शासकीय वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ अशी असते. मात्र, शेळावे बु. ग्रामपंचायतीतअसा कोणताही माहिती फलक नसल्याने ग्रामसेविका कधी येतात आणि कधी जातात, याचा ताळमेळ लागत नाही. अधिकारी जागेवर न मिळाल्याने निराश होऊन परतावे लागते.

कार्यालयाबाहेर केवळ अनुपस्थितीचाच गोंधळ नाही, तर ग्रामसेविकेचे नाव आणि संपर्क क्रमांकाचा फलकही लावण्यात आलेला नाही. धक्कादायक बाब म्हणजे, बाहेर तक्रार पेटी” असा फलक लिहिलेला आहे, पण प्रत्यक्षात तिथे तक्रार पेटीच अस्तित्वात नाही. यामुळे ग्रामस्थांनी आपल्या अडचणी आणि तक्रारी मांडायच्या कुठे? असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी यात त्वरित हस्तक्षेप करावा. ग्रामसेविकेच्या उपस्थितीचे निश्चित वार आणि वेळ दर्शवणारा फलक कार्यालयाबाहेर लावण्याचे आदेश द्यावेत,अशी मागणी आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *