![]()
कन्नड येथील बाजार समितीत व्यापाऱ्यांनी संगनमत करून सोयाबीनचे भाव पाडल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला. पिकाला मनमानी भाव दिल्याने शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत तीन तास सोयाबीन खरेदी बंद पाडली. अखेर प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर खरेदी पूर्ववत सुरू झाली. मंगळवार
.
लुटणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा इशारा : संचालक प्रकाश अग्रवाल, संचालक अब्दुल जावेद, सभापती डॉ. मनोज राठोड यांनी चर्चा केली. दर्जा पाहून लिलाव पद्धतीने ६,९०० रुपये क्विंटल दराने खरेदीचा निर्णय झाल्यानंतर खरेदी पूर्ववत झाली. या वेळी अब्दुल जावेद यांनी शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला. खरेदी विक्री संघाचे संचालक आकाश बोलधने व ॲड. किरण अशोक मगर यांनी शेतकऱ्यांसाठी पाणी व मुक्कामाची सोय केली.