![]()
फुलंब्री काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी वोट चोरीचा आरोप करत फुलंब्री शहरातील महात्मा फुले चौकात कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जगन्नाथ काळे, उप जिल्हाध्यक्ष संदीप बोरसे, तालुकाध्यक्ष संतोष मेटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर संविधानातील लोकशाहीसाठी असलेल्या कलम ३२६ चे वाचन करण्यात आले. यादरम्यान केंद्र व राज्य सरकारने लोकशाहीचे निकष पायदळी तुडवल्याचा गंभीर आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. यानंतर फुलंब्री येथील महात्मा फुले चौकात तीव्र आंदोलन करत राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात व निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी करत निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करत निवडणूक आयोगाचा निषेध करण्यात आला. राज्य व केंद्र सरकारच्या कारभाराविरोधात आणि मतदानाच्या अधिकाराच्या रक्षणासाठी आगामी काळात काँग्रेस पक्ष अधिक आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी यावेळी दिला. यावेळी सुदाम मते, पंचायत समिती सदस्य गणेश काळे, सुभाष गायकवाड, सोशल मीडिया प्रमुख बाबुराव डकले, मंगेश मेटे, लक्ष्मण घाईट, महिला अध्यक्ष रेखा वाहटूळे, सुनीता मारग, बिस्मिल्ला शेट, कचरू मैंद, सदाशिव विटेकर, विठ्ठल कोलते, फैयाज शहा, विलास शेरकर, राहुल सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.
Source link
फुलंब्री शहरात काँग्रेसचे व्होट चोरीविरोधात आंदोलन:निवडणूक आयुक्तांच्या फोटोला जोडे मारून निषेध