Headlines

पाणंद रस्त्यासाठी 23.98 लाख रुपये मंजूर; प्रत्यक्षात रस्ताच नसल्याचा दावा:यशवंतनगरमधील कामांची चौकशी न केल्यास उपोषण; ग्रामस्थांचा इशारा



यशवंतनगर (धांद्रीपाडा) येथील दरी शिवारातील पाणंद रस्त्यासाठी २३ लाख ९८ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असतानाही प्रत्यक्षात रस्ताच अस्तित्वात नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे ग्रामस्थांनी हा मुद

.

यासंदर्भात ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी अतुल पाटील व तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन दिले आहे. मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना आणि मनरेगांंतर्गत प्रशासकीय मंजुरी आदेश क्रमांक ०६०/२०२३ नुसार दरी शिवारातील रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र, मंजूर काम प्रत्यक्षात पूर्ण झाले आहे का, याबाबत ग्रामस्थांनी शंका उपस्थित केली आहे. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या मंजुरी आदेश, नकाशे आणि देयकांच्या प्रतींच्या आधारे ग्रामस्थांनी कामाची प्रत्यक्ष स्थिती आणि शासकीय अभिलेखांतील नोंदींची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. तसेच शौचालये, भूमिगत गटारी, वृक्षलागवड, पथदिवे, घंटागाडी, सौरऊर्जा प्रकल्प आणि पेव्हर ब्लॉक यांसह गावातील विविध विकासकामांच्या खर्चाची, तांत्रिक दर्जाची आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.या कामांची संयुक्त पथकाकडून स्थळपाहणी करून निवेदनाची दखल घ्यावी आणि १५ दिवसांत चौकशी अहवाल सादर करावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. निर्धारित मुदतीत ठोस कार्यवाही न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.निवेदनावर जिभाऊ बागुल, दिनेश वाघ, महेंद्र शिंदे, सुनील शिंदे, शिवनाथ सैंदाणे आदींसह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

महसूल विभाग आणि पंचायत समितीच्या संयुक्त पथकाने दरी शिवारातील मंजूर रस्त्याची स्थळपाहणी करून पंचनामा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. संबंधित कामांची कागदपत्रे, देयके आणि प्रत्यक्ष कामाची पडताळणी करावी. चौकशीत अनियमितता किंवा नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून अपात्र खर्चाची रक्कम वसूल करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

^ग्रामस्थांनी यशवंतनगर येथील दरी शिवारातील रस्ता आणि गेल्या पाच वर्षांत झालेल्या इतर कामांच्या चौकशीची मागणी केली आहे. यासाठी चौकशी समिती नेमण्यात येणार असून, १५ दिवसांत रस्त्याची चौकशी करून अहवाल देण्यात येईल. तसेच गेल्या पाच वर्षांतील इतर कामांच्या चौकशीची मागणीही तपासली जाईल. – अतुल पाटील, गटविकास अधिकारी, बागलाण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *