![]()
पुण्यातील संगमवाडी आणि वडगाव बुद्रुक परिसरात देहविक्रयाचे दोन प्रकार पोलिसांनी उघड केले. संगमवाडीतील हॉटेल प्रकरणी दोन तरुणींना ताब्यात घेतले असून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वडगाव बुद्रुकमध्ये एका दाम्पत्याला अटक केली असून चार तरुणींना ताब्यात घेतले आहे. संगमवाडीतील हॉटेलमध्ये तरुणींना पैशांचे आमिष दाखवून देहविक्रयास प्रवृत्त केले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला (एएचटीयू) मिळाली होती. पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने खातरजमा केली आणि हॉटेलवर छापा टाकला. या प्रकरणी आसाममधील तीन दलालांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते आणि उपायुक्त गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. पोलीस निरीक्षक आशालता खापरे, सहायक निरीक्षक सोनाली जगदाळे-साठे, पोलीस कर्मचारी ईश्वर आंधळे, बबनराव केदार, अमेय रसाळ, अविनाश कोंडे, किशोर भुजबळ, सुरेखा आंधळे, मनीषा वायसे, फराह पठाण, वैशाली खेडेकर आणि वैशाली इंगळे या कारवाईत सहभागी होते. दुसऱ्या प्रकरणात, वडगाव बुद्रुकमधील एका सोसायटीच्या सदनिकेत आयुर्वेदिक उपचार केंद्राच्या नावाखाली देहविक्रय सुरू असल्याची माहिती नऱ्हे पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास सापळा लावून बनावट ग्राहकाच्या मदतीने खातरजमा केली आणि सदनिकेवर छापा टाकला. या कारवाईत चार तरुणींना ताब्यात घेण्यात आले. त्यांना देहविक्रयास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून महादेवी विकास चौगुले (वय ४२) आणि विकास शंकर चौगुले (वय ५०, रा. अवनिश रिजन्सी, वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता) यांना अटक करण्यात आली. पोलीस हवालदार स्वप्नील सूर्यवंशी यांनी नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Source link
पुणे पोलिसांनी दोन ठिकाणी देहविक्रयाचे प्रकार उघड केले:संगमवाडी हॉटेल प्रकरणी चौघांवर गुन्हा; वडगाव बुद्रुकमध्ये दाम्पत्य अटकेत, चार तरुणी ताब्यात