- Marathi News
- National
- 4,000 Indian Pilgrims Stranded In Saudi Arabia, Flights Disrupted Due To Attack, Return Journey Becomes Expensive
मोहंमद जमीर हसन | हैदराबाद2 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

उमरासाठी सौदी अरेबियाला गेलेले ४ हजारांहून अधिक भारतीय यात्रेकरू उड्डाणे रद्द झाल्यामुळे तेथेच अडकले आहेत. ८ ऑक्टोबर रोजी रियाधच्या किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर हुती हल्ल्यानंतर उड्डाणे प्रभावित झाल्याने त्यांची घरवापसी कठीण झाली आहे. काही यात्रेकरू मक्का-मदिनामध्ये आहेत तर काही जेद्दाह आणि दमाममध्ये अडकले आहेत. अनेकांचे पैसे आणि नियमित औषधे संपत आहेत. हॉटेल आणि जेवणाचा खर्चही वाढत आहे.
पुरेसे अंथरूण नाही, स्वच्छतागृहांची अवस्थाही बिकट
हैदराबादचे मो. हकीम यांना ३० ऑक्टोबरला परतायचे होते. त्यांनी सांगितले की, २२ ऑक्टोबर रोजी सौदी एअरलाइन्सने हॉटेलमध्ये थांबवले होते. उड्डाण रद्द झाल्यावर दुसऱ्या ठिकाणी पाठवले. आता एका खोलीत १०-१५ लोक राहत आहेत. पुरेसे अंथरूण नाही. स्वच्छतागृहांची अवस्था वाईट आहे. गरम पाणीही मिळत नाही. सोबत वृद्ध, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचे रुग्ण आहेत. औषधे संपली आहेत.