Headlines

10 दिवसांत निफाडचे किमान तापमान 8 अंशांनी घसरले:दिवसा प्रचंड उकाडा, रात्री गारवा तर पहाटे थंडी, निफाड तालुक्याचे तापमान 12.7 अंश सेल्सिअस


.

निफाड तालुक्यात थंडीची चाहूल लागली आहे. यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती आहे, अशा परिस्थितीत दिवसा कडाक्याचे ऊन, रात्री गारवा आणि पहाटे गुलाबी थंडी, असे वातावरण सध्या निफाड तालुक्यात पाहायला मिळत आहे. बुधवारी पहाटे निफाड तालुक्याचे तापमान १२.७ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. दहा दिवसांपूर्वी हेच तापमान २० अंश सेल्सिअस होते. निफाडकारांना पारा घसरल्याने थंडीची चाहूल लागली आहे.

तालुक्यात दरवर्षी पारा मोठ्या प्रमाणात घसरतो. त्यामुळे सर्वात नीचांकी तापमानाची नोंद होते. गतवर्षी डिसेंबर महिन्यात ४.५ अंश सेल्सिअस पर्यंत पारा घसरला होता. दीपक जाधव, हवामानतज्ञ

{थेट फटका नाही : ‘अर्णब’ चक्रीवादळाचा जिल्ह्यावर थेट परिणाम होणार नाही. {पावसाचे स्वरूप : चक्रीवादळाच्या उर्वरित अवशेषांमुळे जिल्ह्यात तुकड्या-तुकड्यांमध्ये हलका ते तुरळक स्वरूपाचा असेल. {परिणामाचा कालावधी : ३० ऑक्टोबर ते ३-४ नोव्हेंबर.

{ ढगाळ वातावरणामुळे तात्पुरता खंड : पुढील काही दिवस ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असल्याने थंडीचा प्रभाव तात्पुरता कमी राहील. { ५ ते ६ नोव्हेंबरनंतर हवामान स्वच्छ : साधारण ५ तारखेपर्यंत थंडी कमी राहून ६ नोव्हेंबरनंतर वातावरण हळूहळू निवळण्यास सुरुवात होईल. { ९ नोव्हेंबरपासून थंडी : नाशिक जिल्ह्यात ९ नोव्हेंबरनंतर थंडीमध्ये मोठी वाढ होईल. या काळात दिवसाच्या तापमानातही घसरण होऊन दिवाळीच्या दिवसांत कडाक्याची थंडी अनुभवायला मिळेल. १५ नंतर पुन्हा ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *