![]()
पंढरपूर शहरातील चंद्रभागा वाळवंट परिसर स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ ठेवण्याच्या उद्देशाने पंढरपूर नगरपरिषदेने स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न झाले. दि. ७ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत एकूण ८५ टन कचरा संकलित केला. आजच्या स्वच्छता मोहिमेत तब्बल २६ टन कचरा संकल
.
पंढरपूर नगरपरिषदेसह अभियान राबवण्यात आले. यामध्ये आयएमए , उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर, देशमुख जिम कट्टा ग्रुप, गुजराथी रुखी समाज संस्था, अनुलोम सामाजिक संस्था, आपटे उपलप प्रशाला, श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था यांनी सहभाग घेतला.
पंढरपूर शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ करण्यासाठी दर बुधवारी सकाळी ७.३० वाजता स्वच्छता व श्रमदान अभियान आयोजित करण्यात येते. आजचे श्रमदान हे या अभियानातील चौथे श्रमदान होते. यात सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, विविध मंडळे, नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने केले आहे.