![]()
भाजपने सर्वच जागा आम्ही लढणार आणि आम्हीच जिंकणार या भावनेला मुरड घातली पाहिजे, ही महायुतीमधील घटक पक्ष म्हणून शिवसेनेची भावना आहे. भाजपला आत्मपरीक्षण करण्याची गरज असून, महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत त्यांनी चांगला समन्वय ठेवण्याची गरज आहे. जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भाजपची ही मोठी जबाबदारी आहे. नक्कीच महायुती म्हणून यावर आत्मचिंतन होईल. 5-0 निकाल अपेक्षित असताना 3-2 असा निकाल का आला, याचे आत्मचिंतन आम्ही करू. एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा मित्रपक्षांमध्ये समन्वय कसा राहील, याकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत शिवसेना प्रवक्ते आनंद परांजपे यांनी व्यक्त केले आहे. आनंद परांजपे म्हणाले की, अमरावती मतदारसंघात भाजपचे 3 उमेदवार प्रचार करत होते, तरीही शिवसेनेचे किरण सरनाईक हे विजयी झाले. आम्ही भाजपवर काहीही आरोप केला नाही आणि करणारही नाही. मात्र, नागपूरमध्ये भाजपला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. नागपुरात भाजपचे माजी आमदार अनिल सोले यांनी बंडखोरी केली आणि अर्ज मागे घेण्याच्या दिवशी त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही. त्यानंतर त्यांनी पाठिंबा दिला, पण तिथे काय निकाल लागला, हे सर्वांनी पाहिले आहे. ..म्हणून सचिन सानपांना पाठिंबा आनंद परांजपे म्हणाले की, 25 उमेदवार निवडून येतील असा दावा करत असताना गोकुळ दूध संघात महायुती तिथे 12 वरच थांबली. महायुतीमधील पक्षांनी एकमेकांवर आरोप करणे थांबवले पाहिजे. अमरावतीमध्ये सुद्धा भाजपचे 3 बंडखोर उमेदवार उभे होते, तरीही आम्ही त्यांच्यावर टीका केली नाही. त्यामुळे त्यांनीही शिवसेनेवर आरोप करू नये. जगातील सर्वांत मोठ्या पक्षाने आत्मचिंतन केले पाहिजे. रवींद्र धंगेकर यांच्यावर काय कारवाई करायची, याबद्दल एकनाथ शिंदे योग्य तो निर्णय घेतील. शिवसेनेने पुण्यातील किमान एकतरी जागा लढवली पाहिजे, ही आमच्या शिवसैनिकांची आग्रही भूमिका होती. त्या ठिकाणी भाजपचा विद्यमान आमदार नसल्यामुळे शिवसेनेला एक जागा सोडावी, अशी आमची मागणी होती; म्हणूनच आम्ही सचिन सानप यांना पाठिंबा दिला. ..तर महायुतीला निश्चित यश मिळेल आनंद परांजपे म्हणाले की, भाजपचे अमरावतीमध्ये 3 बंडखोर उमेदवार होते. भाजपने त्यांच्यावर औपचारिक कारवाई केली असली, तरी स्थानिक लोकप्रतिनिधी प्रत्यक्षात नेमका कोणाचा प्रचार करत होते, याची शोध पत्रकारिता नवनाथ बन यांनी केली आहे का? असा सवाल त्यांनी केला. तसेच, शिवसेनेकडून कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण करण्यात आलेला नाही, आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. आगामी काळात तिन्ही मित्रपक्षांमध्ये चांगला समन्वय राहावा, ही जबाबदारी मोठा पक्ष म्हणून भाजपची आहे. मित्रपक्षांना योग्य सन्मान आणि योग्य प्रतिनिधित्व देण्याची भूमिका जर त्यांनी ठेवली, तर महायुतीला आगामी प्रत्येक निवडणुकीत निश्चितच यश मिळेल. फेक नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न आनंद परांजपे म्हणाले की, राहुल गांधी यांनी EVM बद्दल आपले एक मतद तयार केले आहे. जनतेमध्ये फेक नरेटीव्ह तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ते निवडून आल्यावर ते EVM वर आक्षेप घेत नाही, पण पराभव झाला की बॅलेट परवर निवडणूक घ्या असे म्हणतात. लोकशाहीमध्ये जनता ज्यांच्यावर विश्वास ठेवते तो पक्ष निवडून येत असतो. संजय गायकवाडांना समज दिली जाईल आनंद परांजपे म्हणाले की, सचिन सानप यांना पाठिंब्याचे पत्र जर आधीच दिले असते तर कदाचित आज त्या मतदारसंघात चित्र वेगळे असते. संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन शिवसेना करत नाही. या वेळेसचा दसरा मेळावा सुद्धा शिवसेनेने बळीराज्यासाठी ठेवला होता. आम्ही शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. संजय गायकवाड यांना योग्य समज दिली जाईल. हे ही वृत्त वाचा धंगेकरांवर एकनाथ शिंदेंनी तातडीने कारवाई करावी:त्यांनी केसाने गळा कापला, मित्रपक्षाच्या हव्यासापोटी पुणे पदवीधर सीट गमावली- नवनाथ बन
मित्रपक्षाच्या एका जागेच्या हव्यासापोटी आमचा उमेदवार पुणे पदवीधर मतदारसंघात पराभूत झाला. तर छत्रपती संभाजीनगरात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार चव्हाण यांना शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांनी विरोध करत त्यांच्या विरोधात काम केले. पुण्यात तर रवींद्र धंगेकर यांनी मतदारांना जाहीर पणे आवाहन केले की भाजपच्या उमेदवाराला मतदान करू नका. धंगेकर यांनी केसाने गळा कापण्याचा निर्णय घेतला असेल तर एकनाथ शिंदेंनी धंगेकर यांच्यावर कारवाई केली पाहिजे. शिक्षक मतदारसंघापूरते आम्ही समजू शकतो पण पदवीधरमध्ये उमेदवार नसताना भाजपचे काम केले नाही, असे नवनाथ बन यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर
Source link
भाजपने मित्रपक्षांचा सन्मान ठेवावा:भाजपने 'सर्व जागा आम्हीच लढणार अन् आम्हीच जिंकणार या भावनेला मुरड घालावी- आनंद परांजपे