Headlines

मातृभूमी सेवा पुरस्कारांचे पुण्यात वितरण:डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, सत्याचे राजकारण, समाजकारण आणि संस्कृतीकरण व्हावे




मनोहारी मैत्र संघातर्फे पुण्यात मातृभूमी सेवा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना त्यांनी सत्याचे राजकारण, समाजकारण आणि संस्कृतीकरण व्हावे, असे सांगितले. संस्कृती समर्पणावर उभी असते. सत्यनिष्ठा आणि सत्याची पूजा हे संस्कृतीचे भूषण आहे, असे डॉ. सबनीस म्हणाले. संस्कृतीला सत्याचा आधार नसेल, तर ती निरर्थक ठरते. मराठी संस्कृती सत्याबरोबरच संतत्वावरही उभी आहे. वृत्तीत सेवा आणि समर्पण नसेल, तर संस्कृतीला अर्थ राहत नाही, असेही त्यांनी सांगितले. मनोहारी मैत्र संघ, पुणे यांनी हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता. महावितरणचे संचालक राजेंद्र पवार, रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर आणि मनोहारी मैत्र संघाचे प्रमुख मनोहर कोलते उपस्थित होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम झाला. गुरुवर्य केशवराव जेधे स्मरणार्थ पुरस्कार लालासाहेब मोहिते यांना, छत्रपती व्यंकोजीराजे भोसले स्मरणार्थ पुरस्कार ॲड. मारुती आबा गोळे यांना आणि ह. भ. प. हैबतराव आरफळकर स्मरणार्थ पुरस्कार डॉ. अरविंद नेरकर यांना देण्यात आला. आचार्य प्र. के. अत्रे स्मरणार्थ पुरस्कार डॉ. सुभाष तळेकर यांना, मदर तेरेसा स्मरणार्थ पुरस्कार कैलास दुधाळे यांना आणि डॉ. आनंदीबाई जोशी स्मरणार्थ पुरस्कार डॉ. गजेंद्र देशपांडे यांना प्रदान करण्यात आला. इतिहासात अनेकांनी समाजसेवेचे व्रत घेऊन काम केले. ही परंपरा निःस्वार्थपणे सुरू आहे, याचा आनंद असल्याचे डॉ. सबनीस म्हणाले. समाजात समता आणि सत्याचा प्रतिसाद उमटणे आवश्यक आहे. ही परंपरा पुढे नेणे मोलाचे आहे, असेही त्यांनी सांगितले. मनोहारी मैत्र संघाने ज्यांचा सत्कार केला, ते महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने ऊर्जास्रोत आहेत, असे राजेंद्र पवार म्हणाले. सत्कारमूर्तींनी सेवाभावी वृत्तीने समाजसेवा करून अनेकांच्या आयुष्यात प्रकाश पोहोचवला आहे, असेही त्यांनी सांगितले. —————- हेही वाचा.. सुनील माने यांनी साहित्य संमेलन रद्द करण्याची मांगणी केली: 18 कोटींचा निधी दुष्काळग्रस्त शेतकरी, ग्रामीण भाग आणि पाण्यासाठी वापरण्याचे आवाहन
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुनील माने यांनी यंदाचे साहित्य संमेलन रद्द करून त्यासाठीचा निधी दुष्काळग्रस्तांसाठी वापरण्याची मागणी केली आहे. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असून, संमेलनासाठी सरकारने १८ कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे, असे त्यांनी सांगितले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *