जळगाव-भुसावळ महामार्गावर नशिराबादजवळ मध्यरात्री दोन ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात सोयाबीनची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा चालक रमेश यादव यांचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला आहे.
.
मिळालेल्या माहितीनुसार, सोयाबीन भरलेला ट्रक (क्रमांक MH 40 BG 6287) हा गुजरातहून नागपूरच्या दिशेने जात होता. मध्यरात्रीच्या सुमारास नशिराबादजवळ आल्यावर या ट्रकची समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकला जोरदार धडक बसली. हा दुसरा ट्रक दीपनगर येथून राख भरून नाशिकच्या दिशेने जात होता. दोन्ही वाहनांचा वेग जास्त असल्यामुळे सोयाबीन वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.
अपघातानंतर चालक रमेश यादव हे केबिनमध्येच अडकून पडले. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने दोन्ही ट्रक बाजूला सारून, तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर चालक रमेश यादव यांना केबिनधून बाहेर काढण्यात यश आले. त्यांना गंभीर व दुखापतग्रस्त अवस्थेत त्वरित जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
हे ही वृत्त वाचा
संभाजीनगरात सपोर्ट दुरुस्ती करताना नवीन इमारतीचा स्लॅब कोसळला:3 मजूर बचावले, 1 दबल्याची भीती, चिकलठाणा आठवडी बाजार परिसरातील घटना

चिकलठाणा येथील आठवडी बाजार परिसरात सुरू असलेल्या एका नव्या इमारतीच्या पार्किंगचा स्लॅब गुरुवारी (२९ ऑक्टोबर) रात्री ७.३० वाजेच्या सुमारास अचानक कोसळला. या दुर्घटनेत चार मजूर मलब्याखाली अडकले होते. सुदैवाने त्यापैकी ३ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, एक मजूर अद्यापही मलब्याखाली दबल्याचा संशय असून, रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दल आणि पोलिसांकडून त्याचा युद्धपातळीवर शोध सुरू होता. वाचा सविस्तर
पुणे-सोलापूर महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळला:एका मजुराचा मृत्यू, 4 ते 5 जण अडकल्याची भीती; दोषींवर कारवाई करणार- दत्तात्रय भरणे

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा एक भलामोठा ढिगारा अचानक कोसळल्याने ४ ते ५ जण या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले असून, आतापर्यंत दोघांना ढिगाऱ्याखालून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. उर्वरित नागरिकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे, तर दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशाराही भरणे यांनी दिला आहे. वाचा सविस्तर