Headlines

पैठणमध्ये गोवंश कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा:तीन जणांवर गुन्हा, कुरेशी मोहल्ल्यात कारवाई; 2 लाख 10 हजारांचे गोमांस जप्त




शहरातील कुरेशी मोहल्ला परिसरात सुरू असलेल्या गोवंश कत्तलखान्यावर पैठण पोलिसांनी शुक्रवारी (३० ऑक्टोबर) सकाळी छापा टाकला. या कारवाईत २ लाख १० हजार रुपये किमतीचे गोमांस, कत्तलीचे अवशेष, सत्तूर व सुरे जप्त करण्यात आले. तसेच कत्तलीसाठी बांधून ठेवलेली जिवंत गोवंश जनावरेही पोलिसांच्या निदर्शनास आली. याप्रकरणी तीन जणांसह इतरांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी सांगितले की, पोलिस उपनिरीक्षक ऋषिकेश तळेकर हे शुक्रवारी सकाळी बीट क्रमांक एकचे अधिकारी म्हणून गस्तीवर असताना त्यांना कुरेशी मोहल्ला परिसरात बेकायदेशीररीत्या गोवंश जनावरांची कत्तल करून मांस विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पंच आणि पोलिस पथकासह संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी शब्बीर रशीद कुरेशी, जाफर सलाम कुरेशी आणि रफीक हसन कुरेशी यांच्या घरामागील परिसरात गोवंश जनावरांची कत्तल करून मांस विक्री केली जात असल्याचे पोलिसांना आढळून आले. तसेच काही जिवंत गोवंश जनावरे चारा व पाण्याविना बांधून ठेवल्याचेही निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळावरून गोमांस, कत्तलीचे अवशेष, सत्तूर, सुरे आणि जिवंत गोवंश जप्त केले. जप्त केलेल्या मांसाचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीए चाचणीसाठी नमुने घेण्यात आले. त्यानंतर उर्वरित मांसाची नियमानुसार विल्हेवाट लावण्यात आली. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक ऋषिकेश तळेकर यांच्या फिर्यादीवरून, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ऋषिकेश तळेकर करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *