Headlines

शेलगाव:लोहगाव येथे विजेचा धक्का लागून 11 वर्षीय वैभवचा मृत्यू




लोहगाव येथील कारखाना वस्तीवर विजेचा धक्का लागून ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. वैभव मधुकर भालेराव असे मृत मुलाचे नाव आहे. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूमुळे भालेराव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मधुकर भालेराव हे आपल्या कुटुंबासह लोहगाव शिवारातील कारखाना परिसरातील वस्तीवर राहतात. त्यांना घरकुल मंजूर झाल्याने घराचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान, शाळेतून घरी आल्यानंतर वैभव घरातील इलेक्ट्रिक होल्डरमधून वायर काढत असताना त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. घटनेनंतर कुटुंबीयांनी वैभवला तातडीने चिंचोली लिंबाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच बीट अंमलदार सुनील भिवसने यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी पिशोर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *