![]()
वडोदवाडी येथे मका चोरीचा प्रतिकार करणाऱ्या एका शेतकऱ्यावर चोरट्याने जीवघेणा हल्ला करून मारहाण केल्याची घटना २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. वडोदवाडी येथील शेतकरी राजू तुपे हे घराच्या छतावर असताना त्यांना मक्याच्या शेतात बॅटरीचा उजेड चालू-बंद होताना दिसला. त्यांनी तात्काळ शेतात धाव घेतली. तेथे एक अज्ञात चोरटा पोत्यांमध्ये मक्याची कणसे भरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तुपे यांनी विचारणा केली असता, चोरट्याने त्यांच्यावर हल्ला करत मारहाण केली आणि अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. १० क्विंटल मका चोरीला गेल्याचे तुपे यांनी सांगितले. मारहाणीत राजू तुपे यांना दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. वडोद बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
Source link
वडोदवाडी येथे चोरट्याकडून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला:10 क्विंटल मका चोरीला, शेतकऱ्यावर उपचार सुरू