Headlines

आळेफाटा:आळेफाट्यात गावठी कट्ट्यासह तरुणाला अटक




आळेफाटा परिसरातील संतवाडी रोडवर बेकायदेशीररीत्या गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तरुणाला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ऋषीकेश गणेश पाडेकर (वय २६, रा. संतवाडी, ता. जुन्नर) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पुणे ग्रामीण जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार शाखेचे पथक जुन्नर विभागात गस्त घालत होते. त्यावेळी आळेफाटा-संतवाडी रस्त्यावर एका व्यक्तीकडे गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून पाडेकर याला ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान त्याच्याकडे गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे आढळली. पोलिसांनी हा शस्त्रसाठा जप्त करून संशयिताला पुढील कारवाईसाठी आळेफाटा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक साबळे यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *