Headlines

आंदोलन:जामनेरात बंद सीसीटीव्हींना घातले हार‎, 8 वर्षांपासून कॅमेरे धूळखात असल्याने केला निषेध




शहरात वाढत्या चोऱ्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, नगर परिषदेने बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या आठ वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. या निष्क्रिय कारभाराचा निषेध करण्यासाठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अविनाश बोरसे यांनी शहरातील बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना चक्क पुष्पहार अर्पण करून अनोखे आंदोलन केले. जामनेर नगर परिषदेने शहराच्या सुरक्षिततेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून प्रमुख चौक व रस्त्यांवर सीसीटीव्ही यंत्रणा उभारली होती. मात्र, दुर्दैवाने गेल्या आठ वर्षांत हे कॅमेरे पूर्ण क्षमतेने कार्यान्वितच होऊ शकले नाहीत. देखभालीअभावी बहुतांश कॅमेऱ्यांची दुरवस्था झाली असून काही ठिकाणचे कॅमेरे तर चोरीस गेले आहेत. परिणामी, शहरातील गुन्हेगारी, चोऱ्या आणि छेडछाडीच्या घटनांवर पोलिसांना नजर ठेवणे कठीण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने शहरात तात्काळ नवीन व अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते सुरू करावेत, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. शहरात सातत्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. मुख्य रस्ते, बाजारपेठ आणि चौकांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे अत्यंत आवश्यक आहेत. ही यंत्रणा तात्काळ सुरू करावी किंवा नवीन कॅमेरे बसवावेत, यासाठी पालिकेला वारंवार निवेदने दिली. मात्र, प्रशासनाने या विषयाकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने हे आंदोलन करावे लागल्याचे बोरसे यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *