Headlines

ग्रामीण विकासासाठी पंचायत समितीद्वारे चालना- आ. भुमरे:ढोरकीन परिसरात सिमेंट रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन




ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा सक्षम करण्यासह गावागावांतील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून विकासकामांना चालना देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन आमदार विलास भुमरे यांनी केले. गावातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि शैक्षणिक सुविधा ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबी असून पंचायत समितीच्या माध्यमातून अशा मूलभूत सुविधांच्या कामांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पंचायत समितीच्या सभापती वैशाली विनोद बोंबले यांच्या पुढाकारातून पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून ढोरकीन परिसरात विविध विकासकामे करण्यात आली आहेत. यामध्ये ढोरकीन तांडा येथे सिमेंट रस्ता, कारकीन-ढोरकीन रंधे वस्ती येथे सिमेंट रस्ता, अहिल्यानगर ढोरकीन येथे ड्रेनेज लाइन, ढोरकीन येथे पाइपलाइन, मामा कॉलनी येथे पाणीपुरवठ्यासाठी पाइपलाइन, तसेच जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी आरओ फिल्टरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रसंगी सभापती वैशाली बोंबले, विनोद बोंबले, भूषण कावसानकर, जिल्हा परिषद सदस्य दिलीप जगताप, उपसभापती संजय लघाने, रवी काळे, अंकुश रंधे, आप्पासाहेब निर्मळ, बाबुराव पडुळे, विजय गोरे, काकासाहेब टेके, कृष्णा गिधाने, पोपट औटे, अभिजीत तावर, नितीन तांबे, सतीश शेळके, भरत मुकुटमल, गलांडे, मनोज गायके, विक्रम भुजंग, सतीश लबडे, सोपान बोबडे, रावसाहेब नाडे, सुरेश लिपाने, रमेश नवले, रियाज शेख, रणजीत नवले, महेश सोलाटे, योगेश बोबडे, गणेश बोंबले, सुभाष मुळे, प्रवीण मुळे, बाबा पा. मुळे,, महेश मापारी,, सुभाष बादाडे, रामेश्वर खुणे, किशोर भावले, काका भावले, आयुब कुरेशी, नितीन राठोड, कैलास राठोड व कल्याण राठोड यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. सभापती वैशाली बोंबले यांनीही पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासकामे प्रभावीपणे राबविण्यावर आपला भर राहणार असल्याचे सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *