![]()
राज्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार स्थानिक आमदारांसोबत पंढरपूर तालुक्यातील दुधाळी, सोलापूर, भूम-परंडा आणि धाराशिव या भागांचा दौरा करत आहेत. या जिल्ह्यांमधील टँकर आणि पाण्याच्या गंभीर परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी दुष्काळाचे भीषण वास्तव समोर आणले असून, प्रशासनाकडून घेतलेल्या प्राथमिक माहितीनुसार सध्या तिथे पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि नागरिकांच्या हाताला काम देण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. शरद पवार म्हणाले, सोलापूरमध्ये 139 गावं बाधित आहेत. इथे 135 टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. 40 विहिरी आहेत. 21 इंधन विहिरी आहेत. माढामध्ये 110 टॅंकर आहेत. एका जिल्ह्यात, एका तालुक्यात असे प्रमाण आहे. शेजारच्या जिल्ह्यात अशीच परिस्थिती आहे. या दुष्काळग्रस्त पट्ट्यात मदतीची गरज आहे. धीर देण्याची गरज आहे. मला खात्री आहे की राज्य सरकारने जर केंद्र सरकारला हे पटवून दिले तर भरीव मदत मिळेल. पाण्याच दिवसेंदिवस डिमांड वाढत असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. खडकवासला आणि इतर धरणातील पाणी काळजीपूर्वक वापरले पाहिजे. आज पासून ते जवळपास जून पर्यंत काळजी घ्यावी लागणार आहे. पाण्याचा साठा यावर लक्ष दिल पाहिजे, अशी मागणी पवारांनी केली आहे. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, रामलीला मैदानावर विरोध आज महारॅली काढणार आहे, त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ज्ञानेश कुमार यांच्या संदर्भात केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेण्याची गरज होती. त्याच्यामुळे आज आणि उद्या सर्व विरोधी पक्ष एकत्र येणार आहेत. आमच्या पक्षाच्या वतीने सुप्रिया सुळे आणि स्थानिक नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती शरद पवार यांनी दिली. मी जबाबदार माणूस आहे. जबाबदारीने भाष्य करत असल्याचे पवारांनी म्हटले. तसेच ठाणे येथील भाजप यात्रेवरही पवारांनी भाष्य केले. मी त्यावर राजकीयदृष्ट्या बोलणार नाही. राजकारण आणू नये सर्वांनी मदत करावी ही आराजकता नाही. कोणी राजकारण आणू नये. संकटावर मात करावी लागेल. पाच हजार मदतीविषयी माझी दिल्ली आणि मुख्यमंत्र्यांशी बैठक झाली आहे, काहीतरी मार्ग काढला जाईल अशी खात्री आहे, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे.
Source link
'पाणी, चारा आणि नागरिकांच्या हाताला काम द्या':शरद पवारांकडून दुष्काळग्रस्त भागांची पाहणी; सोलापूर, धाराशिवमध्ये टँकरच्या स्थितीचा आढावा