संजय राऊत यांना रावणाबद्दल प्रेम आहे म्हणून ते रावणावी स्तुती करत आहे. परंतु ज्या रावणाचा अहंकार संपवण्याचे प्रभु रामचंद्राने केले. त्यांचप्रमाणे तुमचा आणि राहुल गांधींचा अहंकार संपवण्याचे काम देशातील जनता करेल. रामलीला मैदानावर जी अराजकता माजवण्याचा
.
नवनाथ बन म्हणाले की, रावण कितीही मोठा आणि विद्वान असला तरी त्यांचा अंत झाला आहे हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवले पाहिजे. त्यांची स्तुती करत असताना प्रभ श्रीरामाचे 140 कोटी भक्त तुम्हाला माफ करणार नाही हे लक्षात ठेवावे. राहुल गांधींच्या नेतृत्वात काम करायला शरद पवार तयार नाहीत, उद्धव ठाकरे मुंबईतील घरात बसून आहेत पण दिल्लीतील मोर्च्यात जात नाही. इंडिया आघाडीचे लोकं दिल्लीत जात असताना जे दिल्लीत जात नाही त्यांना राहुल गांधींचे नेतृत्व मान्य नाही. उबाठा गट हा बचत गट झाला आहे.

राज ठाकरेंनी राऊतांचा पानउतारा केला
नवनाथ बन म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंना संजय राऊत कसे आवडत नव्हते हे राज ठाकरेंनी ‘बोध कीर्तन’ पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्यात सांगून टाकले. बोध कीर्तनाचा नव्हे तर बाळबोध नर्तनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांचे किस्से सांगून राऊतांचा पानउतारा केला. म्हणून आज संजय राऊत यांचे तोंड बारीक झाले होते. राऊत ना बाळासाहेबांचे होऊ शकले ना हिंदूत्वाचे होऊ शकले. आता तुम्ही राहुल गांधी यांचे होऊ पाहत असल्याने राज ठाकरेंनी काल तुमची काय पात्रता आहे हे सांगून टाकले.
राहुल गांधींनी काँग्रेसच्या बांधणीकडे लक्ष द्यावे
नवनाथ बन म्हणाले की, राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढण्याऐवजी स्वत:च्या पक्षाच्या विरोधात मोर्चा काढला पाहिजे. देशात बॅलेट पेपरवर झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत 28 पैकी केवळ 1 जागेवर त्यांच्या पक्षाचा विजय झाला.बॅलेट असो किंवा EVM जनतेचे मत हे भाजपच्या आणि एनडीएच्या पाठीशी आहे. इंडिया आघाडीला घरी बसवण्याचे काम जनतेने करुण दाखवले आहे. राहुल गांधी यांनी असे मोर्चे काढण्यापेक्षा काँग्रेस कार्यकर्त्यांची बांधणी केली तर बरे होईल.
हे ही वृत्त वाचा
काँग्रेसची लढाई भारत अन् संविधानासोबत:राहुल गांधींच्या पक्षाला चीनकडून डोनेशन का मिळते? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांची खरी लढाई ही भारत आणि संविधानासोबत आहे. त्यामुळेच आपल्याला त्यांच्याविरोधात मैदानात उतरावे लागले आहे. याचा इतिहास पाहिला तर, 1975 मध्ये दिवंगत इंदिरा गांधी यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकली होती, तेव्हा न्यायालयाने त्यांची निवडणूक रद्द ठरवली होती. आज आम्हाला लोकशाहीचे धडे देणाऱ्या काँग्रेसने इंदिरा गांधींच्या कार्यकाळात काय झाले, याचा विचार केला पाहिजे. त्यावेळी संविधानाची मोडतोड करत न्यायालय आणि लोकशाहीला संपवण्याचे काम काँग्रेसने केले. आज वोट चोरीचा आरोप करणाऱ्या याच लोकांनी प्रत्यक्षात संविधान चोरी केली आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ठाण्यात भाजपच्या लोकतंत्र बचाव पदयात्रेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी असे म्हटले आहे. वाचा सविस्तर