Headlines

राज ठाकरेंच्या नातीचं बारसं:अमित-मिताली ठाकरेंच्या लेकीचं नाव ठेवलं 'अहिल्या'; शिवतीर्थावर आनंदाचे वातावरण




मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि त्यांच्या पत्नी मिताली यांच्या आयुष्यात काही महिन्यांपूर्वी एका चिमुकलीचे आगमन झाले. नातीच्या आगमनामुळे शिवतीर्थावर आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आता दिवाळीच्या मंगल पर्वावर या चिमुकलीचा नामकरण सोहळा पार पडला असून, राज ठाकरे यांनी आपल्या लाडक्या नातीचे नाव ‘अहिल्या’ असे ठेवले आहे. 7 सप्टेंबर रोजी अमित ठाकरे यांचा मोठा मुलगा कियान याला अहिल्याच्या रूपाने लहान बहीण मिळाली असून, या ऐतिहासिक नावाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. अहिल्या या नावाला एक अत्यंत खास आणि सखोल अर्थ आहे. संस्कृतमध्ये या नावाचा अर्थ सुंदर, निष्कलंक, पवित्र आणि दोषरहित असा होतो. हिंदू पौराणिक कथांमध्येही या नावाचा विशेष उल्लेख आढळतो. त्यानुसार अहिल्या या महर्षी गौतम यांच्या पत्नी होत्या. हे नाव सौंदर्य, पावित्र्य आणि अंतर्निहित सामर्थ्याचे प्रतीक मानले जाते, ज्यामुळे या नावाला एक वेगळेच आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वलय प्राप्त झाले आहे. ऐतिहासिक वारसा आणि महत्त्व अहिल्या हे नाव ऐकताच लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या महान कार्याची आठवण येते. भारताच्या इतिहासात त्यांच्या कृतिशील आणि कल्याणकारी कार्याचा उल्लेख सुवर्णाक्षरांनी केला जातो. त्यांच्या याच कार्याचा सन्मान करत जिल्ह्याचे नामकरण ‘अहिल्यानगर’ असे करण्यात आले आहे. अहिल्याबाईंनी आपल्या चतुर, क्षमाशील आणि शांत स्वभावाने सर्वांची मने जिंकली होती; तोच समृद्ध वारसा या नावातून प्रतिबिंबित होतो. शिवतीर्थावर आनंदाचे वातावरण अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे हे 27 जानेवारी 2019 रोजी विवाहबंधनात अडकले होते. त्यांना कियान नावाचा एक मुलगा असून, आता त्यांच्या कुटुंबात अहिल्याच्या रूपाने कन्यारत्नाचे आगमन झाले आहे. या नव्या पाहुणीच्या आगमनाने ठाकरे कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला असून, चिमुकल्या अहिल्याच्या पावलाने ‘शिवतीर्थ’ बंगल्यावर सध्या मोठा जल्लोष आणि चैतन्याचे वातावरण आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *