Headlines

तुरुंगातून बडतर्फ पोलीस उपनिरीक्षकाने रचला बँक दरोड्याचा कट:27 किलो सोने आणि 12 लाखांची रोकड लंपास, चौघे अटकेत




जळगाव तालुक्यातील भोकर गावात रविवारी दुपारी स्टेट बँकेच्या शाखेवर सशस्त्र दरोडा पडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. बंदुकीचा धाक दाखवत आणि गोळीबार करत दरोडेखोरांनी बँकेतून तब्बल 27 किलो सोने आणि साडेबारा लाख रुपयांची रोकड लंपास केली. दरोड्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, बँक कर्मचाऱ्यांची सतर्कता, ग्रामस्थांचे धाडस आणि पोलिसांनी केलेल्या तातडीच्या कारवाईमुळे चौघांनाही मुद्देमालासह पकडण्यात यश आले. या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, या संपूर्ण दरोड्याचा मुख्य सूत्रधार एक बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, संबंधित पोलीस उपनिरीक्षकाने कारागृहात असतानाच हा दरोडा घालण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शंकर जसक हा पूर्वी पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होता. 2023 मध्ये जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या बँक दरोड्याच्या प्रकरणात तो दोषी आढळला होता. या गुन्ह्यानंतर पोलीस विभागाने त्याच्यावर कारवाई करत त्याला सेवेतून बडतर्फ केले होते. तेव्हापासून तो कारागृहात होता. मात्र, तुरुंगात असतानाही त्याने गुन्हेगारी कारवायांचे नियोजन सुरूच ठेवल्याचे या घटनेतून समोर आले आहे. तुरुंगात ओळख, त्यातूनच दरोड्याचा कट कारागृहात असताना शंकर जसक याची खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी गजानन पवार याच्याशी ओळख झाली. कालांतराने या दोघांमध्ये जवळीक वाढली. याच ओळखीतून दोघांनी बँक लुटण्याचा कट आखल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. या कटाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी अंकुश चव्हाण आणि श्रवण चव्हाण या आणखी दोघांना सोबत घेतले. त्यानुसार, चौघांनी जळगाव तालुक्यातील भोकर गावातील स्टेट बँकेच्या शाखेला लक्ष्य केले. बँकेत मोठ्या प्रमाणात सोने आणि रोकड असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दरोड्याचे नियोजन केले होते. त्यानुसार रविवारी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास चौघेही बँकेत दाखल झाले. हातात शस्त्रे असल्याने बँकेतील कर्मचारी आणि उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बंदुकीचा धाक दाखवून 27 किलो सोने, साडेबारा लाखांची रोकड लुटली बँकेत प्रवेश केल्यानंतर दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना शस्त्रांचा धाक दाखवला. त्यानंतर गोळीबार करत दहशत निर्माण केली आणि बँकेतील सोने व रोकड ताब्यात घेतली. अवघ्या काही वेळात त्यांनी सुमारे 27 किलो सोने आणि साडेबारा लाख रुपयांची रोकड लंपास केली. मुद्देमाल ताब्यात घेतल्यानंतर चौघांनीही तेथून पळ काढला. मात्र, दरोडेखोरांच्या या कारवाईदरम्यान बँक कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे घटनेची माहिती तातडीने बाहेर पोहोचली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक नागरिकांनीही आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गावकऱ्यांनी दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केल्याने आरोपींच्या पळून जाण्याच्या प्रयत्नांना अडथळा निर्माण झाला. ग्रामस्थांचा पाठलाग, विदगावजवळ एक आरोपी पकडला दरोड्यानंतर आरोपी गावाबाहेर जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. काही वेळाने यातील एक आरोपी विदगावजवळ आढळून आला. ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी त्याच्याकडील रोकड आणि बॅगाही पोलिसांनी ताब्यात घेतल्या. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. पोलिसांनी पाठलाग करून उर्वरित आरोपींनाही ताब्यात घेतले. अशा प्रकारे बँकेतून लुटलेल्या सोने आणि रोकडसह चारही आरोपी पोलिसांच्या हाती लागले. बडतर्फ अधिकाऱ्याचा सहभाग उघड झाल्याने खळबळ या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, दरोड्याचा कट रचणारा मुख्य सूत्रधार पूर्वी पोलीस दलात अधिकारी म्हणून कार्यरत होता. बँक दरोड्याच्या जुन्या गुन्ह्यात दोषी ठरल्यानंतर त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर कारागृहात असतानाच त्याने पुन्हा एका मोठ्या दरोड्याचे नियोजन केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलीस दलासह परिसरातही या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपास करत चारही आरोपींना मुद्देमालासह अटक केली. या कारवाईत सहभागी असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक होत असून, त्यांना बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती आहे. या दरोड्याचे नियोजन नेमके कसे करण्यात आले, आरोपींना बँकेतील सोने आणि रोकडची माहिती कशी मिळाली, तसेच या कटामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. हेही वाचा…. ‘महत्त्वाकांक्षा असणे चुकीचे नाही, मात्र संघर्ष टाळा’:उदयनराजेंचा नेत्यांना सल्ला; इच्छुकांच्या निवडणूक लढविण्याच्या अधिकाराचे समर्थन राजकारणात प्रत्येकाची काही ना काही महत्त्वाकांक्षा असते. ती बाळगण्यात किंवा निवडणूक लढविण्यात गैर काय? मात्र, या महत्त्वाकांक्षेचे रूपांतर आपापसांतील संघर्षात होता कामा नये, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. त्याचवेळी जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेच्या अनुषंगाने सुरू असलेल्या स्थानिक राजकीय वादांशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट करून त्यांनी सावध राजकीय अंतर राखले. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *