![]()
भारतीय अर्थव्यवस्थेसोबतच जागतिक अर्थव्यवस्थेतही सनदी लेखापाल योगदान देत आहेत. भारतातील एक लाखांहून अधिक सीए जागतिक अर्थव्यवस्थेसाठी काम करत आहेत, असे ‘आयसीएआय’च्या मेंबर्स इन इंडस्ट्री अँड बिझनेस कमिटीचे अध्यक्ष सीए डॉ. अनुज गोयल यांनी सांगितले. दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय)च्या कमिटी फॉर मेम्बर्स इन इंडस्ट्री अँड बिझनेस (सीएमआयबी), आयसीएआय पुणे शाखा आणि झी बिझनेस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आयसीएआय सीएफओ फोरम एलिव्हेट २.०’चे आयोजन करण्यात आले होते. पुणे स्टेशनजवळील हॉटेल ग्रँड शेरेटॉन येथे हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला आयसीएआयच्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, सीएमआयबीच्या उपाध्यक्ष सीए प्रिती सावला, विभागीय समितीचे सदस्य सीए अभिषेक धामणे उपस्थित होते. आयसीएआय पुणे शाखेचे अध्यक्ष सीए प्रणव आपटे, उपाध्यक्ष सीए निलेश येवलेकर, सचिव सीए नेहा फडके आणि खजिनदार सीए नंदकुमार कदमही उपस्थित होते. ‘विकासा’च्या अध्यक्षा सीए सारिका दिंडोकार, कार्यकारिणी सदस्य सीए सचिन मिनीयार आणि सीए प्रज्ञा बंब यांच्यासह इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. गोयल म्हणाले, कंपनीत मुख्य वित्त अधिकारी म्हणून काम करण्यासाठी केवळ पदवी किंवा पुस्तकी ज्ञान पुरेसे नसते. उद्योगात काम करण्यासाठी काही कौशल्येही आवश्यक असतात. उद्योग आणि व्यवसायात काम करणाऱ्या सीएमुळे अर्थव्यवस्था आणि उद्योगांचे आर्थिक व्यवहार स्थिर राहण्यास मदत होते. भारतीय सीए कौशल्याधारित आणि प्रात्यक्षिक शिक्षण घेत असल्याने त्यांचे विशेष महत्त्व आहे, असेही गोयल यांनी सांगितले. चितळे म्हणाले, गेल्या काही वर्षांत बाह्य परिस्थितीत मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे काम करताना अंतर्गत अडचणींपेक्षा बाह्य अडचणी वाढल्या आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेतील बदलांचा विचार करून भारतीय सीए दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न करतात. नव्याने सीए होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि सभासदांसाठी आयसीएआय विविध कार्यक्रम आणि प्रशिक्षण कार्यशाळा घेत असल्याचेही चितळे यांनी सांगितले. सावला म्हणाल्या, पुणे हे शिक्षण, आयटी आणि व्यवसायाचे केंद्र आहे. पूर्वी सीएचे काम ऑडिटपुरते मर्यादित होते. आता सीए इन्व्हेस्टमेंट बँकिंग, रिसर्च अॅनालिस्ट आणि अकाउंटिंगसह विविध क्षेत्रांत काम करतात. सीएची भूमिका गेल्या काही वर्षांत बदलली आहे. सीए हे अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने त्यांनी कामात नैतिकता आणि प्रामाणिकपणा जपायला हवा, असे सावला म्हणाल्या.
Source link
भारतीय सीए जागतिक अर्थव्यवस्थेतही योगदान देत आहेत:अनुज गोयल यांचे मत; पुण्यात ‘सीएफओ फोरम एलिव्हेट 2.o’चे आयोजन