![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना बुधवारी सकाळी दूरध्वनी करून त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. ‘देशाकडे लक्ष द्यायला आता सुप्रिया सुळे तयार झाल्या आहेत. आम्ही देशासाठी त्यांच्यासोबत काम करू’, असेही त्यांनी सांगितले. तीन दिवसांपूर्वी दुष्काळी दौऱ्यावर असलेल्या पवारांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथून डिस्चार्ज मिळाल्यावर पवारांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोदी-पवारांच्या संवादाबाबत पवारांचे निकटवर्तीय विठ्ठल मणियार यांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी म्हणाले, पवारांनी इतकी वर्षे देशाला मोलाचे मार्गदर्शन केले आणि आजही ते करत आहेत. परंतु त्यांनी प्रकृतीकडे अधिक लक्ष द्यावे आणि ठणठणीत राहून सर्वांना मार्गदर्शन करत राहावे. सुप्रिया आता देश सांभाळत जबाबदाऱ्या पेलण्यासाठी पूर्णपणे तयार झाल्या असल्याने पवारांनी देशाची कोणतीही चिंता करू नये. मोदींच्या या अत्यंत प्रेमळ आणि आपुलकीच्या शब्दांमुळे पवार भावुक झाले. त्यांनी मोदींचे आभार मानले. मोदी-पवार सलोखा पुन्हा स्पष्ट; राजकीय बदलाचेही संकेत? पंतप्रधान मोदी आणि पवारांमधील सलोख्याचे संबंध या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले. मात्र, मोदींनी ‘आम्ही सुप्रिया सुळेंसोबत देशासाठी काम करू’ असे वाक्य वापरून राजकीय बदलाचे संकेत दिले आहेत का, अशीही चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे एकीकरण आणि सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद अशा हालचाली येत्या काही महिन्यांत होऊ शकतात, असेही विश्लेषकांचे म्हणणे आहे.
Source link
आधी तुम्ही तब्येत सांभाळा; मोदींचा शरद पवारांना सल्ला:आम्ही सुप्रियांसाेबत देश सांभाळू, असेही माेदी म्हणाले