Headlines

स्तनदा मातांनी सुविधांचा लाभ घ्यावा:जिल्हा परिषद सदस्या गीतांजली पाथ्रीकर यांचे आवाहन, जातेगावात हिरकणी कक्षाचे लोकार्पण



प्राथमिक आरोग्य केंद्र जातेगाव येथे नुकतीच जन आरोग्य समितीची बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषद तथा महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या गीतांजली पाथ्रीकर यांनी भूषवले. या वेळी आरोग्य केंद्रामध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या “हिरकणी क

.

मार्गदर्शन करताना सदस्या गीतांजली पाथ्रीकर यांनी, माता आणि बालकांच्या आरोग्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या हिरकणी कक्षाचा आणि उपलब्ध आरोग्य सुविधांचा सर्व स्तनदा मातांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले. बैठकीदरम्यान त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच सध्या सुरू असलेल्या “तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ या विशेष अभियानाचीही त्यांनी सखोल माहिती घेतली. गावातील प्रत्येक पात्र नागरिकाचे आयुष्मान भारत कार्ड लवकरात लवकर तयार करून घेण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी या वेळी उपस्थित सर्व आशा सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले. या महत्त्वपूर्ण बैठकीला पंचायत समिती सदस्या पद्माताई जाधव यांच्यासह जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अंतर्गत उपकेंद्रांमधील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *