Headlines

देवगाव रंगारी जिल्हा परिषदेअंतर्गत गावांच्या पाण्यासाठी नियोजन करावे:आढावा बैठकीमध्ये जिल्हा परिषद सदस्य डाॅ. संजय गव्हाणे यांच्या सूचना




दुष्काळी परिस्थिती हाताळण्याबाबत प्रशासकीय यंत्रणा हलगर्जीपणा करत आहे. भटाणा व शिवना टाकळी पाणीपुरवठा योजनांना गती देऊन देवगाव रंगारी जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्हा परिषद सदस्य डॉ. संजय गव्हाणे यांनी दिले. देवगाव रंगारी गावातील पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या दूर करून नागरिकांना नियमित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी भटाणा धरण व शिवना टाकळी पाणीपुरवठा योजनांना गती देण्याच्या दृष्टीने देवगाव रंगारी ग्रामपंचायत येथे आढावा बैठक पार पडली. डॉ. संजय गव्हाणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. देवगाव रंगारी येथील साठवण तलावातून सध्या आठ दिवसाआड ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, विविध अडचणींमुळे हा पुरवठा विस्कळीत होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य नियोजन केल्यास ग्रामस्थांना तीन दिवसाआड पाणीपुरवठा करणे सहज शक्य आहे; यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्याची गरज आहे. देवगाव रंगारी गावासाठी भटाणा धरण तसेच शिवना टाकळी धरणातून ‘जल जीवन मिशन’अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर आहेत. मात्र, अद्याप या योजनांमधून गावाला पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. या योजनांची कामे अर्धवट का ठेवण्यात आली आहेत आणि गुत्तेदारांकडून कामे पूर्ण करण्यास एवढा विलंब का होत आहे, असा सवाल डॉ. गव्हाणे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला विचारला. बैठकीस ग्रामपंचायत अधिकारी वाल्मीक जाधव, विश्वजित करंजीकर, किशोर दिवेकर, सुदर्शन धस, नितीन भांडवलदार, रशिद पठाण, कृष्णा पगार उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *