Headlines

पुण्यतिथी महोत्सवात हायड्रोपोनिक चारा निर्मितीचे शेतकऱ्यांना दाखवले प्रात्यक्षिक:जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याचा पर्याय; पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम



राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने पशुवैद्यकीय दवाखाना, मोझरी येथे हायड्रोपोनिक चारा निर्मितीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. यावेळी हायड्रोपोनिक चारा कसा तयार करावा, जनावरांच्या आहारातील त्याचे महत्त्

.

स्वामी सीतारामदास महाराज गोरक्षण संस्था, गुरुदेवनगर येथील संचालक मुरलीधर बोथे, मालधूर येथील समर्पण प्रतिष्ठान गोरक्षणचे संचालक अमोल मानकर यांनीही हायड्रोपोनिक चारा निर्मितीचा उपक्रम राबवला आहे. याशिवाय मोझरी येथील सार्थक कडू यांच्या घरीदेखील हायड्रोपोनिक चाऱ्याची निर्मिती करण्यात येत आहे. दुष्काळसदृश परिस्थितीत जनावरांना हिरवी वैरण कशी उपलब्ध करून देता येईल, याचे प्रात्यक्षिक डॉ. मनीष पुंड, सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, तिवसा यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आले. अल निनोच्या प्रभावामुळे देशात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून आगामी काळात हिरव्या चाऱ्यासह पाण्याची कमतरता भासू शकते. अशा परिस्थितीत हायड्रोपोनिक चारा निर्मिती आणि निकृष्ट चाऱ्याचे सकस चाऱ्यात रूपांतर करून पशुपालकांनी संभाव्य संकटावर कशी मात करावी, याबाबत संस्थाप्रमुख तथा सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. विलास पकडे यांनी उपस्थित वारकरी, यात्रेकरू व पालखी भक्तांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. यावेळी पशुसंवर्धन विभागामार्फत व्ही.एम.डी.डी.पी. योजनेंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची तसेच पशुपालकांसाठी उपलब्ध असलेल्या इतर योजनांची माहितीही जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आली. या उपक्रमावेळी भूषण बोबडे, धीरज बारई, डॉ. सुरेश भीतकर, सार्थक कडू यांच्यासह पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी व सहकारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *