Headlines

पारंपरिक वेशभूषा अन् फॅशन शो; इनरव्हीलचा करवा चौथ सोहळा साजरा:आधुनिक, पारंपरिक वेशभूषेत महिलांचा सहभाग; विजेत्यांचा रजत मुकुट देऊन गौरव



पतीच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, कल्याणासाठी संस्कृतीतील पावन करवा चौथ उत्सव इनरव्हील क्वीनच्या वतीने विविध स्पर्धांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील मूर्तिजापूर रस्त्यावरील हर्षप्रतीक येथे ‘मिस अँड मिसेस करवा चौथ’ या संकल्पन

.

या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार गौरी धायगुडे, अमरावतीच्या आयुक्त सौम्या शर्मा, अश्विनी लहाने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लब अध्यक्ष पल्लवी दिवेकर होत्या. यावेळी उपाध्यक्ष किरण हीरानंदानी, सचिव दीप्ती अग्रवाल, माजी अध्यक्ष कविता पोहरे, कोषाध्यक्ष भाविनी शाह, आयएसओ हरसिमरन जनेजा, संपादक सोनल संकलेचा यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागताने सोहळ्याची सुरुवात झाली. खंडेलवाल ज्वेलर्सच्या सहकार्याने आयोजित उपक्रमाचे संयोजन सचिव दीप्ती अग्रवाल, डॉ. कल्याणी पवित्रकार, शौर्य खंडेलवाल, रिशिका खंडेलवाल यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन भाविनी शाह यांनी केले. आभार किरण हीरानंदानी यांनी मानले.

ग्रुमींग तज्ज्ञांनी सांभाळली परीक्षकांची भूमिका कार्यक्रमात आधुनिक बाज दिलेल्या पारंपरिक सोहळ्याचे मान्यवरांनी कौतुक केले. या सोहळ्यात स्पर्धांचे परीक्षण सौंदर्य तज्ज्ञ शरद भुयार, पिंकी खंडेलवाल यांनी केले, तर ग्रुमींग तज्ज्ञ म्हणून सोनल मोहनदासानी यांनी जबाबदारी सांभाळली. याप्रसंगी इनरव्हीलचे सर्व पदाधिकारी, सदस्य व केजे परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *