Headlines

ग्रामीण भागात शाळेमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी जनजागृतीची गरज:शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार, जिल्हा परिषदेमधून सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार सोहळा



जिल्हा परिषदेमधून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा सन्मान-सत्कार सोहळा जि. प. उर्दू प्राथमिक शाळा, ताजनापेठ येथे आयोजित करण्यात आला. ग्रामीण शाळेतील घटती विद्यार्थी संख्या ही धोक्याची घंटा आहे. विद्यार्थी संख्या उंचावण्यासाठी जागृतीपर उपक्रम सक्रियपणे

.

सेवानिवृत्त शिक्षकांसाठी पेन्शनर अदालत त्वरित कार्यान्वित करू, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तौशिब अहमद होते. यावेळी सेवानिवृत्त शिक्षणविस्तार अधिकारी रवींद्र चौथमल उपस्थित होते. शिक्षक नेते सैय्यद जव्वाद यांनीही सहभाग घेतला. सेवानिवृत्ती सोहळा शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला. प्रास्ताविक आयोजक ज्ञानेश्वर मांडेकर यांनी केले. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात योगदान केलेल्या व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमात संघटना प्रतिनिधी प्रकाश चतरकर, शशिकांत गायकवाड, अजरोउदीन वसीमउद्दीन, गोपाल सुरे, संघर्ष सावरकर, राजेश देशमुख, विलास मोरे, अन्सार देशमुख, महेंद्र भगत, गजानन काळे, सैय्यद रब्बानी, मारोती वरोकार, प्रशांत आकोत यांनी शिक्षण विभागातील समस्या मांडल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शगुपता जमाल यांनी केले. आभार नजरत जबीन यांनी मानले.

सेवानिवृत्त शिक्षकांसाठी पेन्शनर अदालत कार्यान्वित करू ः शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी सेवानिवृत्त शिक्षकांची प्रभावी दखल घेत गौरव केला. त्यांनी शिक्षण क्षेत्रातील अडचणींवर प्रकाश टाकला. सेवानिवृत्त बांधवांच्या समस्यांचा त्वरीत निपटारा व्हावा. त्यासाठी पेन्शनर यांच्या मागणीनुसार पेन्शन अदालत त्वरीत कार्यान्वित करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *