Headlines

आकाश कंदील, दिव्यांनी उजळली बाजारपेठ:दिवाळीच्या स्वागतासाठी सज्ज झाले; बाजारपेठेत खरेदीस गर्दी, माेठी आर्थिक उलाढाल




रोषणाईचा आणि आनंदाचा सण असलेली दिवाळी अवघ्या पाच दिवसांवर आल्यामुळे दुष्काळ काहीसा नजरेआड करुन नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी करणे सुरु केले आहे. नागरिकांच्या या भूमिकेमुळे बाजारात चैतन्याचे वातावरण पसरले आहे. सध्या घरोघरी रंगरंगोटी, साफसफाई व स्वागताची तयारी सुरू आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे स्थान हे रंगीबेरंगी ”आकाश कंदील” आणि पारंपरिक ”मातीच्या दिव्यांचे असते. आधुनिकतेच्या युगात बऱ्याच बाबी नवीन आल्या असल्या तरी रोषणाई हीच दिवाळीची खरी गोडी आहे. या पारंपरिक घटकांशिवाय दिवाळी अपूर्ण वाटते. बाजारात कापडी आणि आकर्षक डिझाईन्सचे आकाश कंदील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. शिवाय हाताने रंगवलेले आणि कलाकुसरीचे मातीचे दिवेही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. प्लास्टिक व कृत्रिम उपकरणांऐवजी लोक आता पर्यावरण पूरक आणि पारंपरिक वस्तूंना प्राधान्य देत आहेत. या दिव्यांच्या प्रकाशाने केवळ घरेच उजळत नाहीत तर या छोट्या-मोठ्या विक्रेत्यांच्या आणि कारागिरांच्या चेहऱ्यावरही आशेचा प्रकाश पसरतो. हा सण सर्वांच्या आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येवो अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दिवाळीसाठी विविध आकाराचे नाविन्यपूर्ण दिवे बाजारात दाखल झाले असून त्यामध्ये मोतीचूरचा लाडू दिवा, सुतळी बॉम्ब दिवा, कमळ दिवा, जेली दिवा, साऊंड दिवा, कंदील दिवा, मोम मटका दिवा, सुगंधी दिवा, त्याचप्रमाणे मातीपासून तयार केलेले विविध आकाराचे दिवेसुद्धा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *