Headlines

एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तत्काळ रद्द करा:ऑल इंडिया पँथर सेना




सोयगाव | शासनाने होऊ घातलेला एससी उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी ऑल इंडिया पँथर सेना नेते दिपक केदार यांच्या नेतृत्वाखाली सोयगाव तालुक्याच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, मुख्य सचिव यांना निवेदन देण्यात आले. अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरणाचा निर्णय सामाजिक एकतेवर घाव घालणारा आहे. संविधानाच्या तत्त्वांविरोधात आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. हा निर्णय एससी समाजात फूट पाडणारा आहे. पूर्णपणे अन्यायकारक आहे, असेही म्हटले आहे. मागण्यांची दखल घ्यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेजवळ, तालुका अध्यक्ष गौतम जोंधळे, अरुण सदाशिव, देविदास शेजवळ उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *