Headlines

Maharashtra Board Exam 2027 Timetable Released; SSC HSC Dates Announced


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10 वी (SSC) आणि इयत्ता 12 वी (HSC) च्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. राज्

.

इयत्ता 12 वी (HSC) बोर्ड परीक्षा 2027 च्या तारखा

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी (इयत्ता 12 वी) मंडळाने जाहीर केलेला कालावधी खालीलप्रमाणे असेल.

  • प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा: बुधवार, 20 जानेवारी 2027 ते शनिवार, 06 फेब्रुवारी 2027 या कालावधीत पार पडतील.
  • लेखी परीक्षा: सोमवार, 08 फेब्रुवारी 2027 ते गुरुवार, 18 मार्च 2027 या दरम्यान लेखी परीक्षा घेतल्या जातील.

इयत्ता 10 वी (SSC) बोर्ड परीक्षा 2027 च्या तारखा

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेसाठी (इयत्ता 10 वी) मंडळाने जाहीर केलेला कालावधी खालीलप्रमाणे असेल.

  • प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा: गुरुवार, 28 जानेवारी 2027 ते शनिवार, 13 फेब्रुवारी 2027 या कालावधीत पूर्ण केल्या जातील.
  • लेखी परीक्षा: सोमवार, 15 फेब्रुवारी 2027 ते सोमवार, 15 मार्च 2027 या दरम्यान मुख्य लेखी परीक्षा आयोजित केल्या जातील.

अधिकृत वेळापत्रक कोठे पाहावे आणि कोणती काळजी घ्यावी?

विद्यार्थी आणि पालकांच्या सोयीसाठी व संभ्रम टाळण्यासाठी राज्य मंडळाने महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. परीक्षांचे सविस्तर व दिनांकनिहाय वेळापत्रक मंडळाच्या [http://www.mahahsscboard.in](http://www.mahahsscboard.in) या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

छापील वेळापत्रकच अंतिम

संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेले वेळापत्रक हे केवळ विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना मंडळाकडून दिले जाणारे छापील वेळापत्रकच अंतिम मानले जाईल. विद्यार्थ्यांनी त्या छापील वेळापत्रकावरूनच आपल्या विषयांच्या तारखांची खात्री करावी.

अफवांवर विश्वास ठेवू नका

व्हॉट्सॲप, सोशल मीडियावर व्हायरल होणारे किंवा कोणत्याही अनधिकृत संकेतस्थळावरील वेळापत्रक ग्राह्य धरू नये व त्यावर विश्वास ठेवू नये, असे कळकळीचे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी केले आहे.

—————————————————-

हेही वाचा…

CBSE 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर:16 फेब्रुवारीपासून सुरू होणार परीक्षा; अभ्यासाच्या नियोजनासाठी 101 दिवस आधीच घोषणा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार, यंदा दोन्ही वर्गांच्या परीक्षा 16 फेब्रुवारी 2027 (मंगळवार) पासून सुरू होणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरातून लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.