Headlines

पुण्यात संतापजनक घटना:कौटुंबिक वादातून 80 वर्षीय वडिलांच्या डोक्यात फावडे घालून हत्या; 46 वर्षीय मुलाला अटक




पुण्यातील पर्वती पायथा परिसरातील जनता वसाहतीत कौटुंबिक वादातून मुलाने वडिलांच्या डोक्यात फावडे घालून त्यांचा खून केला. पर्वती पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. जगन्नाथ धोंडू होडे (वय ८०, रा. वेताळबाबा मंदिराजवळ, जयभवानीनगर, जनता वसाहत, पर्वती) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा मुलगा रामचंद्र (वय ४६) याला अटक करण्यात आली. पोलीस शिपाई धनंजय रौंदळ यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगन्नाथ आणि रामचंद्र यांच्यात कौटुंबिक वाद झाला. त्यानंतर रामचंद्रने घरातील फावड्याने वडिलांच्या डोक्यात वार केला. जगन्नाथ गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त गजानन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे आणि पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या रामचंद्रला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खिलारी पुढील तपास करत आहेत. एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू पुण्यातील मंगळवार पेठेतील वेलस्ली रस्त्यावर एसटी बसच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शमा हसन सय्यद (वय ६४, रा. सदानंदनगर, मंगळवार पेठ) असे मृत महिलेचे नाव आहे. सलीम बाबू अत्तार (वय ५०, रा. वेलस्ली रस्ता, मालधक्का चौक, मंगळवार पेठ) यांनी बंडगार्डन रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑक्टोबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास शमा सय्यद वेलस्ली रस्त्याने जात होत्या. इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ एसटी बसने त्यांना धडक दिली. त्यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करत आहेत. ——— हेही वाचा.. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: 2027 च्या बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर; 8 फेब्रुवारीपासून बारावी, तर 15 फेब्रुवारीपासून दहावीची लेखी परीक्षा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10 वी (SSC) आणि इयत्ता 12 वी (HSC) च्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. वेळापत्रक लवकर जाहीर झाल्यामुळे आता राज्यभरातील शिक्षकांना अध्यापनाचे अचूक नियोजन करणे आणि लाखो विद्यार्थ्यांना अभ्यासाची सखोल तयारी करणे अधिक सोपे होणार आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या राज्य मंडळाच्या 9 विभागीय मंडळांमार्फत या परीक्षांचे आयोजन केले जाणार आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *