Headlines

गरज नसेल तर सरकारचे 5 हजार रुपये परत करा:मंत्री गिरीश महाजनांचे आवाहन, जळगावमधील विधानाने चर्चांना उधाण




राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी सरकारने त्यांच्या बँक खात्यांमध्ये 5 हजार रुपयांची अग्रीम रक्कम जमा केली आहे. मात्र, या मदतीवरून आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांना या आर्थिक मदतीची आवश्यकता नाही, त्यांनी सरकारकडून मिळालेले 5 हजार रुपये परत करावेत, असे आवाहन भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाची सध्या चर्चा होत आहे. गिरीश महाजन 7 नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शेतकऱ्यांना मिळालेल्या आर्थिक मदतीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. सरकारने सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 5 हजार रुपये जमा केले आहेत. मात्र, काही शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असून त्यांना या रकमेची विशेष गरज नाही. अशा शेतकऱ्यांनी स्वेच्छेने ही रक्कम सरकारला परत करावी, असे महाजन म्हणाले. माझ्याही खात्यात पैसे आले, पण परत करायचे आहेत आपल्या विधानाच्या समर्थनार्थ महाजन यांनी त्यांच्याकडे भेटायला आलेल्या शेतकऱ्यांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, सरकारकडून शेतकऱ्यांना पाच-पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. मात्र, आज सकाळपासून माझ्याकडे जवळपास 50 शेतकरी आले होते. त्यातील काही शेतकऱ्यांनी त्यांच्या खात्यातही सरकारकडून पैसे जमा झाल्याचे सांगितले. या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या खात्यात 5 हजार रुपये जमा झाले असले तरी त्यांना या पैशांची आवश्यकता नाही. आमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. आमच्याकडे शेतीपूरक व्यवसाय आहेत. त्यामुळे सरकारने दिलेल्या या मदतीचा लाभ खऱ्या गरजू शेतकऱ्यांना मिळावा, अशी त्यांची भावना असल्याचे महाजन यांनी सांगितले. गरजू शेतकऱ्यांना मदत मिळावी, महाजनांचे आवाहन ज्या शेतकऱ्यांना सरकारकडून मिळालेल्या 5 हजार रुपयांची आवश्यकता नाही, त्यांनी ही रक्कम परत करण्याचा विचार करावा, असे आवाहन महाजन यांनी केले. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या शेतकऱ्यांनी मदत परत केल्यास गरजू शेतकऱ्यांना मदतीचा लाभ मिळण्याबाबत त्यांनी भूमिका मांडली. दरम्यान, महाजन यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या स्वरूपावर चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे दुष्काळामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले असताना सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मदतीची गरज आणि तिचा लाभ कोणाला मिळायला हवा, हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. राज्यातील 304 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, राज्यातील 304 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण, पिकांचे नुकसान आणि शेतीशी संबंधित अडचणींमुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून विविध माध्यमांतून मदत केली जात आहे. दिवाळीचा सण शेतकऱ्यांना काहीसा दिलासादायक ठरावा आणि त्यांच्या हातात सणासाठी पैसे असावेत, या उद्देशाने सरकारने 5 हजार रुपयांची अग्रीम मदत त्यांच्या बँक खात्यांत जमा केली आहे. मात्र, आता या मदतीबाबत गिरीश महाजन यांनी केलेल्या आवाहनामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. विशेष म्हणजे, आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकऱ्यांनी पैसे परत करण्याबाबत त्यांनी केलेले विधान राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे. होही वाचा…. मुंब्र्यात 20 दिवसांच्या नवजात बाळाची अडीच लाखांत विक्री:जन्मदात्या आईकडून बाळ घेत रत्नागिरीतील दाम्पत्याला विकले, होमगार्डसह 10 जणांना अटक मुंब्रा परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 20 दिवसांच्या नवजात बाळाची पैशांसाठी विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका टोळीने बाळाच्या जन्मदात्या आईला लक्ष्य करत तिच्याकडून बाळ ताब्यात घेतले आणि त्यानंतर रत्नागिरी येथील एका दाम्पत्याला विकले. या प्रकरणाची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 24 तासांत बाळाचा शोध घेत त्याची सुखरूप सुटका केली. या प्रकरणात होमगार्डसह एकूण 10 जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे ठाणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा…..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *