Headlines

होर्मुझ खुला झाल्याने जिल्ह्यातील केळी निर्यातीला मिळणार चालना:आखाती देशांतून मागणी वाढेल; केळी उत्पादकांचे बाजार भावाकडे लक्ष




इराणने भारतीय जहाजांसाठी होर्मुझ समुद्रधुनीचा मार्ग खुला केल्याने सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून इराण-अमेरिका संघर्षामुळे या सामुद्रधुनीतील जहाज वाहतुकीवर निर्बंध होते. आखाती देशांमध्ये होणारी भारतीय केळीची निर्यात अडचणीत आली होती. आता भारतीय जहाजांना मार्ग मोकळा झाल्याने केळी निर्यातीला पुन्हा गती मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यासह माढा व माळशिरस भागात भागांत केळीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. विशेषतः उजनीच्या पाण्यामुळे वाशिंबे परिसरात केळी लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. येथील केळीला देशांतर्गत बाजारपेठेसह आखाती देशांमध्येही मागणी आहे. मात्र, समुद्री वाहतुकीतील अडथळ्यांमुळे निर्यात मंदावली आणि त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवर झाला होता. निर्यात न झालेला माल देशांतर्गत बाजारात आल्याने केळीचा पुरवठा वाढला आणि बाजार भावात मोठी घसरण झाली. वाढता उत्पादन खर्च, मजुरी, खते, औषधे आणि वाहतुकीचा खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला. देशांतर्गत बाजारपेठेतील अतिरिक्त पुरवठ्याचा दबाव कमी होऊन केळीच्या दरात सुधारणा होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. वाशिंबे । करमाळा तालुक्यातील पोफळज येथील तुकाराम पाटील या शेतकऱ्याच्या कापणीला आलेल्या तीन एकर केळीच्या पिकावर अज्ञात व्यक्तीने तणनाशक फवारल्याने १५ ते २० लाखांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात शेतकरी तुकाराम कल्याण पाटील यांनी करमाळा पोलिसात फिर्याद अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोफळज गावच्या गट नंबर १३९ मधील तीन एकरातील तयार असलेल्या ४००० केळीच्या झाडावर अज्ञात व्यक्तीने पॅराकोट नावाचे तणनाशक बुधवारी संध्याकाळी फवारल्याने केळी बागेचे नुकसान झाले आहे. केळीचे घड काळे पडून पूर्णपणे खराब झाले आहेत. पाटील यांनी तालुका कृषी अधिकारी करमाळा यांच्याकडेही नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी अर्ज दिला असून, कृषी व महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी येऊन बागेची पाहणी करून पंचनामा केला आहे. याचा तपास करमाळा पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे. तीन एकर केळीच्या बागेवर तननाशक फवारल्याने मोठे नुकसान झाले आहे सध्याच्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर १५ ते २० लाखांचे नुकसान सोसावे लागणे ही गोष्ट सोपी नाही. पोलिसांनी या घटनेचा तपास करून नुकसानीची वसुली संबंधित व्यक्तींकडून करावी. -अरुण पवार, ग्रामस्थ, पोफळज व्यापारासाठी होर्मुझ समुद्रधुनी महत्त्वाची आहे करमाळा, माढा आणि माळशिरस या भागातून दररोज सुमारे ५० ते ६० कंटेनर केळी आखाती देशांत (दुबई, ओमान, कतार, सौदी अरेबिया) पाठवली जाते. केळी हे नाशवंत फळ असल्याने निर्यात वेळेत सुरू झाल्याने बागांमध्ये माल सडण्याचा किंवा खराब होण्याचा मोठा धोका टळला आहे. महाराष्ट्रातून मध्य पूर्व (आखाती) देशांत जाणारी ९०% फलोत्पादन निर्यात याच मार्गाने होते. अमेरिका-इराण तणावामुळे जहाजांचा विमा खर्च वाढला होता व कंटेनर्सचा तुटवडा निर्माण झाला होता. इराणने भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना या मार्गावरून सुरक्षित प्रवासाची परवानगी दिली. केळी निर्यातीच्या दृष्टीने होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणे ही सकारात्मक बाब आहे. मात्र, प्रत्यक्ष निर्यात वाढण्यासाठीसुरक्षितत ेचा दृष्टीने जहाज कंपन्यांचा विश्वास निर्माण होणे आणि मालवाहतूक नियमित सुरू होणे आवश्यक आहे. निर्यातीचे व्यवहार आणि जहाजांची वाहतूक पूर्ववत झाल्यानंतरच केळी उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या बाजारभावाचा फायदा मिळू शकेल. पुढील दोन-तीन महिन्यांत परिस्थिती सुधारून निर्यात व्यवसाय सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे. – सनी इंगळे, केळी निर्यातदार, पुणे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *