Headlines

महालक्ष्मीच्या स्वागतासाठी सर्व नगरकर सज्ज:पर्यावरणपूरक खरेदीकडे कल; अनेक भागांमध्ये सजली पूजा साहित्याची दुकाने




दिवाळीतील सर्वाधिक महत्त्वाच्या आणि उत्साहाच्या लक्ष्मीपूजनासाठी सध्या मुख्य शहर आणि उपनगरांमध्ये खरेदीची प्रचंड धामधूम पाहायला मिळत आहे. माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी नगरकरांनी जोरदार तयारी केली असून, संपूर्ण शहरात उत्सवी व चैतन्यमय वातावरण पसरले आहे. शहरातील पारंपरिक मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या माळीवाडा वेस परिसर, चितळे रोड, महात्मा गांधी रोड आणि नवी पेठ भागात रोषणाई आणि खरेदीसाठी अलोट गर्दी उसळली आहे. केवळ मुख्य बाजारपेठच नव्हे, तर सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौक, भिस्तबाग चौक, एकविरा चौक, गुलमोहोर रोड परिसर आणि तपोवन रोड या भागांमध्येही रस्त्यांच्या कडेला विविध पूजा साहित्याची दुकाने सजली आहेत. पणत्या, मातीची खेळणी, लाह्या-बत्तासे, झेंडूची फुले आणि लक्ष्मी-गणेशाच्या मूर्ती खरेदीसाठी झुंबड उडाली होती. { लक्ष्मीची मूर्ती : १०० ते २०० ₹ { केरसुणी (झाडू) : ५० ते ७० ₹ { पणत्या : २० ते ५० ₹ { फुले : ३० ते १०० ₹ असे आहेत साहित्याचे दर १. मूर्ती व फोटो फ्रेम : मातीची किंवा धातूची लक्ष्मी-गणेशाची नवीन मूर्ती किंवा फोटो फ्रेम, सोबत कुबेर व सरस्वतीची प्रतिमा. २. मांडणीचे साहित्य : पाट किंवा चौरंग, नवीन लाल किंवा पिवळे वस्त्र (कापड), तांदूळ (अक्षता), नवीन नाणी आणि नोटेचे बंडल, केरसुणी (झाडू). ३. कलश स्थापन : तांब्याचा किंवा पितळेचा कलश, गंगाजल, आंब्याची डहाळी (पाने), नारळ, सुपारी आणि हळद-कुंकू. ४. सुगंध व प्रकाश साहित्य : मातीच्या पणत्या, कापसाच्या वाती, शुद्ध तूप, तेल, अगरबत्ती, धूप, कापूर आणि अत्तर. ५. फुले व नैवेद्य : झेंडूची फुले, कमळाचे फूल, विड्याची पाने, सुपाऱ्या, लवंग-वेलची, खडीसाखर, लाडू-बर्फीसारखी मिठाई आणि बत्तासे. ६. विशेष पूजन साहित्य : दप्तराची किंवा हिशोबाची नवीन वही, लेखणी (पेन) आणि तिजोरीची चावी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *