![]()
मनीष संताेष परदेशी (वय २२, रा. दांडेकर पूल, जुना दत्तवाडी रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. परदेशी याने पर्वती भागातून दुचाकी चोरली होती. या गुन्ह्याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तपासात परदेशी याने दुचाकी चोरल्याची माहिती पोलीस कर्मचारी अमोल दबडे आणि मारुती तांदळे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने जुना दत्तवाडी रस्त्यावर सापळा लावला. परदेशी याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने पर्वती, शिवाजीनगर, डेक्कन जिमखाना, स्वारगेट, विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आठ दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी आठ दुचाकी जप्त केल्या. त्याच्याकडून दुचाकी चोरीचे सात गुन्हे उघडकीस आले असून, त्याने दुचाकी चोरीचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय असून, त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक गोकुळ महाजन, सहायक निरीक्षक विशाल राऊत, अमोल दबडे, मारुती तांदळे, अमित चिव्हे, सूर्या जाधव, मनोज बनसोड, स्वप्नील घुगे, रणजीत घाडगे, गणेश तरंगे यांनी ही कामगिरी केली. मोटारीची काच फोडून लॅपटाॅप चोरी मोटारीची काच फोडून लॅपटाॅप, पिशवी असा ७१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबविण्यात आल्याची घटना जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी भागात घडली. याबाबत एकाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे एका खासगी कंपनीत कामाला आहे. त्यांच्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकांनी मोटार वाकडेवाडी परिसरात लावली होती. चोरट्यांनी मोटारीची काच फोडून लॅपटाॅप लांबविला. पोलीस कर्मचारी पवार तपास करत आहेत.
Source link
पुण्यात दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला अटक:पर्वती पोलिसांनी आठ दुचाकी जप्त केल्या; चोरीचे सात गुन्हे उघड