Headlines

अमिताभ बच्चन यांच्या बुलेटप्रूफ काच हटवल्या:पण बॉलिवूडमधील कलाकारांच्या मनातील भीती कधी दूर होणार? सचिन सावंतांचा मोदी सरकारला सवाल




अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या बुलेटप्रूफ काचा हटवण्यात आल्या आहेत. मात्र, या काचा नेमक्या कोणाच्या दबावामुळे हटवण्यात आल्या, असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. बुलेटप्रूफ काचा हटल्या असल्या तरी बॉलिवूडमधील कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांच्या मनातील भीती अद्याप कायम आहे. ही भीती कधी दूर होणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. अमिताभ बच्चन हे सुपरस्टार असून एकेकाळचे ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या बुलेटप्रूफ काचा आता हटवण्यात आल्या आहेत. यावर भाष्य करताना सचिन सावंत यांनी या काचा आपल्या टीकेमुळे हटवण्यात आल्या की भारतीय जनता पक्षाच्या दबावामुळे हटवण्यात आल्या, असा प्रश्न उपस्थित केला. याचे उत्तर अमिताभ बच्चन यांनाच माहीत असेल, असेही ते म्हणाले. सचिन सावंत यांनी बुलेटप्रूफ काचा लावण्याच्या निर्णयावरून मोदी सरकार आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका केली. या काचा म्हणजे केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारच्या अपयशाचे प्रतीक असल्याचे त्यांनी म्हटले. बुलेटप्रूफ काचा हटवण्यात आल्या असल्या तरी त्यामुळे बॉलिवूडमधील कलाकारांच्या मनातील भीती संपलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण कायम बॉलिवूडमध्ये काम करणारे कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक सध्या भीतीच्या वातावरणात जगत असल्याचा दावा सचिन सावंत यांनी केला. केवळ सुरक्षेसाठी लावलेल्या काचा हटवून प्रश्न सुटणार नाही. चित्रपटसृष्टीतील लोकांच्या मनात निर्माण झालेली भीती दूर होणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यासाठी सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. या भीतीमागे साबरमती तुरुंगात असलेला गँगस्टर असल्याचा उल्लेख करत सावंत यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. या परिस्थितीला जबाबदार असलेल्या घटकांवर सरकारने ठोस कारवाई करणे आवश्यक आहे, असे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले. मोदी आणि अमित शहांनी उत्तर द्यावे बॉलिवूडमधील कलाकार आणि चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांना सुरक्षिततेची हमी कधी मिळणार, असा थेट सवाल सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केला. देशातील आणि विशेषतः चित्रपटसृष्टीतील लोकांना निर्भयपणे काम करता येईल, असे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे बुलेटप्रूफ काचा हटवण्यापेक्षा कलाकारांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी सरकार काय पावले उचलणार, याचे उत्तर मोदी आणि अमित शहा यांनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. हेही वाचा… शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुख्यमंत्र्यांचा मुक्काम:सकाळी तर्री पोह्यांचा नाश्ता, अभ्यंगस्नान अन् अरुणाताईंनी केली भाऊबीज दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार आणि आत्मविश्वास देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाची दिवाळी शेतकरी कुटुंबासोबत साजरी केली. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे त्यांनी शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम केला. सायंकाळी कुटुंबासोबत भोजन, रात्री गप्पा आणि सकाळी घरगुती तर्री पोह्यांचा नाश्ता, असा हा दिवाळीचा आनंददायी अनुभव मुख्यमंत्र्यांनी घेतला. विशेष म्हणजे, सकाळी अरुणाताईंनी त्यांचे औक्षण करून भाऊबीज साजरी केली. यावेळी ‘पुढच्या वर्षी वहिनींनाही सोबत घेऊन या’, असा आपुलकीचा आग्रह त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे धरला. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *