Headlines

दिवाळीनंतर नागपूरचा एक्यूआय 217 वर:फटाक्यांचा धूर, वाहनांचे उत्सर्जन आणि कोरड्या हवामानामुळे प्रदूषण; वर्षभरातील स्रोतांकडेही लक्ष देण्याची गरज




दिवाळीनंतर नागपूरच्या हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. ८ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता शहराचा वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) २१७ नोंदवला गेला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वर्गीकरणानुसार २०१ ते ३०० हा ‘वाईट’ स्तर आहे. राज्यातील प्रमुख शहरांच्या तुलनेत नागपुरातील हवा सर्वाधिक प्रदूषित होती. मात्र, या प्रदूषणासाठी केवळ दिवाळी किंवा फटाक्यांना जबाबदार धरता येणार नाही. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘समीर’ ॲपवरील रात्री ९ वाजताच्या आकडेवारीनुसार पिंपरी-चिंचवडचा एक्यूआय १९७, नाशिकचा १७७, पुण्याचा १६१, नवी मुंबईचा १५० आणि मुंबईचा १३० होता. पिंपरी-चिंचवडमधील भोसरी निरीक्षण केंद्रावर मात्र एक्यूआय २३६ नोंदवला गेला. शहराचा एकत्रित निर्देशांक आणि स्वतंत्र निरीक्षण केंद्राची नोंद वेगळी असते. दिवाळीपूर्वीही नागपूरची हवा पूर्ण स्वच्छ नव्हती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या बुलेटिननुसार शहराचा एक्यूआय १५३ होता. हा मध्यम स्तर आहे. ८ नोव्हेंबरची २१७ ही नोंद प्रदूषण वाढल्याचे दाखवते. फटाक्यांच्या धुरातून पीएम २.५ आणि पीएम १० हे सूक्ष्म धूलिकण हवेत मिसळतात. त्यामुळे दिवाळीत प्रदूषणात तात्पुरती भर पडते. वाहनांचे उत्सर्जन, रस्त्यांवरील धूळ, बांधकामे, औद्योगिक उत्सर्जन आणि कचरा जाळणे हे वर्षभर सुरू असणारे स्रोत आहेत. पावसाचा अभाव, कोरडे हवामान आणि वाऱ्याचा मंद वेग यामुळे प्रदूषक हवेत जास्त काळ राहू शकतात. हिवाळ्याच्या सुरुवातीला तापमानातील उलटफेराची (इन्व्हर्जन) स्थिती निर्माण झाल्यास प्रदूषक जमिनीजवळ साचण्याची शक्यता असते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *