Headlines

Mohan Bhagwat Recalls RSS History; Ibrahim Stood Against 1930 Ban


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी 1930 च्या दशकातील एक किस्सा सांगताना नमूद केले की, त्या वेळी सेंट्रल प्रोव्हिन्सच्या विधानसभेत संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हा संघाच्या समर्थनार्थ एकही स्वयंसेवक पुढे आला नव्हता

.

भागवत यांनी सांगितले की, इब्राहिम म्हणाले होते— जे लोक हिंदुस्तान हे हिंदू राष्ट्र आहे असे म्हणतात, त्यांना मानसिक रुग्णालयात पाठवले पाहिजे. मी डॉ. हेडगेवार यांना ओळखतो; ते मानसिकदृष्ट्या विक्षिप्त नाहीत; ते एक चांगले माणूस आहेत. त्यामुळे संघ सांप्रदायिक असू शकत नाही.

भागवत म्हणाले— त्या वेळी संघाची स्थापना होऊन काही वर्षे झाली होती. तो फार प्रसिद्ध नव्हता, मात्र डॉ. हेडगेवार यांना सर्वजण ओळखत होते. संघाची सुरुवात झाली तेव्हा स्वयंसेवक हीच त्याची ओळख बनला. आजही १०० वर्षांनंतर स्वयंसेवक हीच संघाची ओळख आहे.

पुढे बोलताना मोहन भागवत म्हणाले, वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. त्यांची क्षमताही वेगवेगळ्या स्तराची असते. मानवी गुण आणि योग्यता यात भिन्नता असते. प्रत्येकात आपले एक वैशिष्ट्ये असते. पण सर्वांमध्ये एक गोष्ट समान असते. ती म्हणजे त्याचे समर्पण. मी स्वत: एक प्रचारक आहे. मी प्रचारकांना पाहिले आहे आणि सातत्याने त्यांना पाहत असतो. त्यामुळे ही गोष्ट अत्यंत सामान्य झाली आहे.

स्वयंसेवकाच्या जीवनात अहंकार किंवा स्वतःसाठी काही अपेक्षा नसते

तसेच स्वयंसेवकाच्या जीवनात अहंकार किंवा स्वतःसाठी काही अपेक्षा नसते. समाजाचे जितके भले होईल तेवढे तो करतो. विकसित व्हावे, अर्पित होऊनी जावे, असे जीवन स्वयंसेवक जगत असतो. असे काम करताना अनेक संकट येतात. मोह देण्यात येतो. मात्र आज स्वतःला स्वयंसेवक सांगणाऱ्या 70 ते 75 लाख स्वयंसेवकांमध्ये 4 हजार लोक स्वतःची अपेक्षा सोडून देशाच्या भविष्यासाठी जगतात. माझ्यासारखा 70 वर्षे पार केलेला व्यक्ती सहनशील बनूच शकतो. तेव्हा राग आणि ताकत नसते, असे भागवत यांनी सांगितले.

मराठीत एक म्हण आहे. लग्नाच्या मांडवात मुंज उरकून घेणे. मात्र इथे उलट होते. मुंज आधी होते. असे जीवन जगण्याची आज गरज आहे. याबाबतीत जगाची नजर आपल्या देशावर टिकून आहे. जगात कोणत्याही पटलावर आपल्याला ही स्थिती दिसेल, असे मोहन भागवत यांनी यावेळी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *