Headlines

आंध्रचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा तिसऱ्यांदा घटस्फोट:रशियन मॉडेल अन्ना कोनिडेला यांच्याशी 2013 मध्ये लग्न केले होते




आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण तसेच त्यांच्या पत्नी अन्ना कोनिडेला यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आहे. लग्नाच्या १३ वर्षांनंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या निवेदनानुसार, हा निर्णय परस्पर समजूतदारपणा आणि आदराने घेण्यात आला. दोघांनीही ते चांगले मित्र राहतील, असे सांगितले. पवन कल्याण आणि अन्ना आपल्या मुलांसाठी समर्पित पालकांची भूमिका बजावत राहतील. मुलांचा आनंद आणि कल्याण ही दोघांचीही सामायिक प्राथमिकता राहील. पवन कल्याण यांनी तीन विवाह केले असून तिन्ही वेळा त्यांचा घटस्फोट झाला आहे. पवन कल्याण यांच्या तीन विवाहांची आणि तिन्ही वेळच्या घटस्फोटाची कहाणी १९९७: पहिला विवाह, पत्नी नंदनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर अवघ्या एका वर्षातच पवन कल्याण यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा विवाह नंदिनी यांच्याशी लावून दिला. एका मुलाखतीत पवन कल्याण म्हणाले होते, “कुटुंबीयांच्या सांगण्यावरून मी हे नाते स्वीकारले होते. काही काळानंतर आमच्यातील गोष्टी बिघडू लागल्या. कोणत्याही नात्यात सर्व काही सुरळीत चालत नाही, त्यामुळे एकमेकांपासून वेगळे होणेच चांगले.” नंदिनी यांच्यापासून घटस्फोट घेण्यापूर्वीच पवन आपल्या सहकलाकार रेनू देसाई यांच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले होते. 2004 मध्ये रेनू यांनी मुलगा अकिरा नंदनला जन्म दिला. घटस्फोट न घेता दुसऱ्या महिलेसोबत राहिल्यामुळे नंदिनीने पवनविरोधात बिगॅमी कायद्यांतर्गत न्यायालयात खटला दाखल केला. तसेच पोटगीसाठी तिने घटस्फोटानंतर दर महिन्याला ५ लाख रुपयांची मागणी केली. नंदिनीने आयपीसीच्या कलम ४९४ अंतर्गत चिरंजीवी, नागेंद्र बाबू आणि रेनू देसाई यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांविरोधातही खटला दाखल केला. या खटल्यानंतर २००७ मध्येच पवनने नंदिनीकडून घटस्फोट घेतला. घटस्फोटाच्या वेळी पवनने ५ कोटी रुपयांची पोटगी दिली होती. २००९: दुसरे लग्न, पत्नी रेनू नंदिनीपासून घटस्फोट घेतल्यानंतर पवनने २८ जानेवारी २००९ रोजी रेनूसोबत लग्न केले. लग्नानंतर रेनूने आध्या या मुलीला जन्म दिला. रेनूसोबतचे वैवाहिक नाते सुरू करण्यासाठी पवनने अनेक प्रयत्न केले, पण रेनूसोबतचे नाते टिकवण्यातही अपयशी ठरले. लग्नाच्या 3 वर्षांनंतरच रेनूने 2012 मध्ये त्यांच्यापासून घटस्फोट घेतला. यावेळी घटस्फोटाचे कारण अफेअर नव्हते. वृत्तांमध्ये दावा करण्यात आला होता की, आर्थिक अडचणीच्या काळात पवन यांनी त्यांचे बंधू नागेंद्र बाबू यांना मदत केली होती, जी घटस्फोटाचे कारण ठरली. मात्र, दोघांनीही याबद्दल कधीच भाष्य केले नाही. घटस्फोट होऊ नये यासाठी पवन यांनी आपल्या वकिलामार्फत खूप प्रयत्न केले, मात्र त्यांना अपयश आले. दोघांचा घटस्फोट झाला तेव्हा पवन ‘तीन मार’ चित्रपटाचे शूटिंग करत होते, जो बॉलिवूड चित्रपट ‘लव्ह आज कल’चा रिमेक आहे. २०१३: तिसरे लग्नात पत्नी अ‍ॅना लेझनेव्हा रेनूपासून घटस्फोट घेतल्यानंतर पवनला रशियन मॉडेल अ‍ॅना लेझनेव्हा हिच्यावर प्रेम झाले. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची भेट झाली होती. रेनूपासून घटस्फोट घेतल्यानंतर अवघ्या एका वर्षाने, ३० सप्टेंबर २०१३ रोजी पवनने अ‍ॅनाशी लग्न केले. या लग्नामुळे पवन मुलगी पोलेना अंजना पवनोव्हा आणि मुलगा मार्क शंकर पवनोविच यांचा पिता झाला. तीन लग्न केल्याबद्दल पवनने म्हटले होते- माझा लग्न करण्याचा मुळीच इरादा नव्हता. ते तर काळाच्या ओघात आपोआप घडत गेले. एक लग्न टिकले नाही, म्हणून मला दुसरे लग्न करावे लागले. तिसऱ्यांदा घटस्फोटाबद्दल म्हणाले- लग्न संपले, पण मित्र म्हणून राहू घटस्फोटाच्या निर्णयानंतर पवन कल्याण यांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे- आयुष्यातील मोठा काळ एकत्र घालवल्यानंतर आम्ही परस्पर समजूत आणि आदर राखत वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे लग्न संपले असले तरी आम्ही चांगले मित्र म्हणून राहू आणि आमच्या लाडक्या मुलांसाठी समर्पित पालकांची भूमिका निभावत राहू. मुलांचा आनंद आणि कल्याण ही नेहमीच आमची समान प्राथमिकता राहील. पवन कल्याण आणि अन्ना कोनिडेला यांनी त्यांच्या शुभचिंतकांना त्यांच्या आयुष्यातील या कठीण काळात गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *