Headlines

Ajit Pawar Accident Case Controversy; Umesh Patil Demands Deep Probe


राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते उमेश पाटील यांनी एक अत्यंत खळबळजनक विधान केले असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार यांच्याबाबतीत घडलेला प्रकार हा अपघात नसून, तो घातपातच आहे, असे मला ठामपणे वाटते. मला असे

.

उमेश पाटील म्हणाले की, अजित पवार यांच्या विमान अपघाताचे प्रकरण हे केवळ माध्यमांसमोर चर्चा करण्याचा विषय नाही, तर या प्रकरणाचा सखोल तपास पूर्ण होऊन सत्य जनतेसमोर येणे अधिक महत्त्वाचे आहे. यासंदर्भात योग्य त्या कायदेशीर आणि प्रशासकीय पातळीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे स्वतः गांभीर्याने पाठपुरावा करत आहेत.

राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू नाही

उमेश पाटील म्हणाले की, आमच्या आमदारांच्या मनात विलीनीकरणाबाबत काय भावना आहे, याची संपूर्ण कल्पना आम्हाला आहे. जर आमदारांच्या मनात तशी भावना असती, तर आमची पावलेही त्या दिशेने पडली असती. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सध्या कोणतीही चर्चा सुरू नाही, नेत्यांच्या वैयक्तिक भेटींना उगाच विलीनीकरणाच्या चर्चेचा रंग दिला जात आहे. आमच्या पक्षातील कोणत्या आमदाराने तुम्हाला असे सांगितले आहे का? कोणी यावर ट्विट केले आहे का, किंवा कोणी ऑफ द रेकॉर्ड तरी असे बोलले आहे का? मग आमदार शरद पवारांना भेटणार आणि विलीनीकरणाची चर्चा करणार, हे माध्यम किंवा इतर लोक स्वतःच कसे ठरवत आहेत? नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

उमेश पाटील म्हणाले की, रामदास कदमांनी पुराव्याशिवाय बिनबुडाचे आरोप करणे थांबवावे. कदमांकडे जर काही ठोस पुरावे असतील, तर त्यांनी ते सार्वजनिकपणे समोर आणावेत. कोकणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जुना राजकीय संघर्ष राहिला आहे. त्या जुन्या संघर्षातूनच ते अशी वक्तव्ये करत आहेत का, असा प्रश्न आता निर्माण होतो.

हे ही वृत्त वाचा

तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू आहात का?:नळावरच्या भांडणासारखी भाषा करू नका, चंद्रकांत पाटलांच्या दादागिरीवर रवींद्र धंगेकर आक्रमक

गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षावरून भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांच्यातील वाकयुद्ध अधिक तीव्र झाले आहे. चंद्रकांत पाटील यांनी काल गोकुळसंदर्भात काढलेल्या मोर्च्यात जी भाषा वापरली, ती पूर्णपणे चुकीची आहे. चंद्रकांत पाटील हे कायम दादागिरी करत असतात, ही त्यांची जुनीच सवय आहे, असा थेट आरोप रविंद्र धंगेकर यांनी केला आहे.

रविंद्र धंगेकर म्हणाले की, चंद्रकांत पाटील म्हणाले की, सतेज पाटलांचे वडील स्कूटरवरून फिरायचे. पण तुम्ही स्वतः शबनम बॅग घेऊन हॉटेलच्या बाहेर कोणी चहा पाजतो का, याची वाट पाहत उभे राहायचात ना? तुमची ही परिस्थिती या महाराष्ट्राने पाहिली आहे. तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू आहात का? चंद्रकांत पाटील यांना सर्वच पक्षांत काय चालले आहे हे माहित असते, त्यांना विचारल्याशिवाय कोणी काही करतच नाही, असा टोला लगावत, चंद्रकांत पाटलांनी कोथरूडऐवजी कोल्हापुरातून निवडणूक लढवून दाखवावी, तिथून लढण्यात खरी मजा आहे, असे आव्हानही त्यांनी दिले. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.