Headlines

जुने शहरातून दीड किलो गांजा जप्त, एकास अटक:पोलिसांची कारवाई; आरोपीला पोलिस कोठडी




अकोला जिल्हा पोलीस दलाच्या ‘ऑपरेशन प्रहार-नार्कोस्ट्राई क’ मोहिमेंतर्गत जुने शहर पोलिसांनी धडक कारवाई करत १ किलो ४९४ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, ९ नोव्हेंबर रोजी जुने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजेश्वर सेतूच्या बाजूला असलेल्या नदीपात्रातील काटेरी झुडपांमध्ये पोलिसांनी छापा टाकला. तेथे संशयास्पदरित्या थांबलेला इसम करण समाधान दामोदर (वय वर्ष, रा. शांतीनगर, जुने शहर, अकोला) याला पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून १.४९४ किलो ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. या प्रकरणी जुने शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीला १० नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कस्टडी मंजूर केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलिस अधीक्षक निलेश पांडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. एनडीपीएस अंतर्गत अजामीनपात्र गुन्हा अमली पदार्थांचे उत्पादन, तस्करी, विक्री, खरेदी आणि बाळगण्यावर कठोर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने १९८५ मध्ये ‘नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस’ कायदा लागू केला. या कायद्यान्वये अमली पदार्थ किंवा नशिल्या वनस्पतींची अवैध तस्करी करणे हा अजामीनपात्र व गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानला जातो. अल्प प्रमाणात गांजा एक वर्षापर्यंत सश्रम कारावास, १ ते २० किलोपर्यंत) गांजा आढळल्यास आरोपीला १० वर्षांपर्यंत सक्तमजुरी व १ लाख रुपयांपर्यंत दंड, २० किलोपेक्षा जास्त गांजा आढळल्यास १० ते २० वर्षांपर्यंत सक्तमजुरी आणि १ ते २ लाख रुपये दंडाची कठोर शिक्षा होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *