Headlines

दुष्काळाच्या सावटातही पुंडलिकबाबांच्या जन्मगावी गोधनासह नदीचे पूजन:गोधर्वन पूजा उत्सवातून घडले भारतीय संस्कृती, सभ्यता अन् परंपरेचे दर्शन



तालुक्यातील गोरेगाव येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भारतीय संस्कृती, सभ्यता व परंपरेचे दर्शन घडवणारा गोवर्धन पूजा उत्सव दुष्काळाच्या सावटातही ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला.

.

काटेपूर्णा नदीवर गावकऱ्यांनी पूजा-अर्चना केली. वर्षानुवर्षे उपकार करणाऱ्या काटेपूर्णा मातेची व गोधनाची पूजा केली. आपली श्रद्धा व्यक्त केली. निष्काम कर्मयोगी महान संत श्री गाडगेबाबा यांनी ९१ वर्षांपूर्वी संत श्री पुंडलिक महाराज यांची जन्मभूमी असलेल्या गोरेगाव येथे वसुबारसच्या दिवशी गावातील गोधनासह नदीचे पूजन करण्याकरिता गोवर्धन पूजा उत्सवाची सुरुवात केली होती. ही प्रथा पंचक्रोशीतील ग्रामस्थ आजही श्रद्धापूर्वक पाळत आहेत. तालुक्यातील काटेपूर्णा नदी तीरावरील गोरेगाव ही संत श्री. पुंडलिक महाराज यांची जन्मभूमी आहे. गोवर्धन पूजेचे गोरेगावात विशेष महत्त्व आहे. संत गाडगेबाबा यांनी १९३५ साली गावातील अंगदराव सानप, खंडूजी पातोंड, माधवराव मुंडे, अभिमानदास सरदार, उरकड महाराज, देवराव कराड, तुकाराम सोनोने, आत्माराम गावंडे, रामराव डोईफोडे आदी ग्रामस्थांना सोबत घेत गोवर्धन पूजेला सुरुवात केली होती, असे ग्रामस्थांनी सांगितले. गोवर्धन पूजा उत्सव साजरा करून भारतीय संस्कृतीचे जतन केले जात आहे. उत्सवासाठी बाहेरगावी गेलेले सर्व चाकरमाने येतात. उत्सवामध्ये विवेक पातोंड, वासुदेव पातोंड, गायक बाळ गंगाधर सरदार, विद्याधर सरदार, सुदाम सरदार, विजय डोईफोडे यांच्यासह गावातील अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभते.

महाप्रसादात यसुराच्या भाजीचे विशेष महत्त्व असते. ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. या दिवशी कोणाच्याही घरी स्वयंपाक केला जात नाही,अशी माहिती राजू चक्रे यांनी दिली. गोवर्धन पूजा उत्सवासाठी गोरेगावसह पंचक्रोशीतील दूरवरील गावांमधील ग्रामस्थांची उपस्थिती असते. संत पुंडलिक बाबा यांच्या जन्मगावी गोवर्धन उत्सव परंपरा हिंदू संस्कृतीचे प्रतीक आहे. हा उत्सव पुंडलिक महाराज यांच्या पावन भूमीत उत्साहात साजरा केला जातो, येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

गाडगेबाबांच्या प्रेरणेतून सुरुवात ^यंदा दुष्काळी परिस्थितीतही गोरेगावातील ग्रामस्थांद्वारे गोवर्धन पूजा उत्सवाची परंपरा तेवढ्याच भक्तिभावाने साजरी करण्यात आली. संत श्री. गाडगेबाबा यांच्या प्रेरणेने गोवर्धन पूजा उत्सव सुरू करण्यात आला होता. तेव्हापासून आजपर्यंत उत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो. – श्रीकांत डोईफोडे , ग्रामस्थ, गोरेगाव.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *