![]()
राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या सर्व चर्चांवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अतिशय सूचक विधान केले आहे. “जशी वेळ येईल, तशा गोष्टी तुम्हाला कळतील,” असे म्हणत त्यांनी विलीनीकरणाच्या प्रश्नाला थेट उत्तर देणे टाळले असले तरी, त्यांच्या या एका वाक्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. नेमके काय घडले पत्रकार परिषदेत? क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात ११ ते १८ नोव्हेंबर दरम्यान आयोजित ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’ कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी सुनेत्रा पवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी आदिवासी विकास योजना, घरकुल वाटप आणि रोजगार शिबिरांची सविस्तर माहिती दिली. मात्र, पत्रकार परिषदेच्या शेवटी पत्रकाराने सध्या राज्यभर गाजत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर त्यांना प्रश्न विचारला. “सध्या विलीनीकरणाचा मुद्दा गाजतोय आणि मुख्यमंत्र्यांनी देखील यावर भाष्य केलंय…” असा प्रश्न विचारताच सुनेत्रा पवार यांनी अतिशय संयतपणे उत्तर दिले. सुनेत्रा पवार म्हणाल्या, “मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितल्याप्रमाणे आजचा आपला विषय (बिरसा मुंडा जयंती) हा अत्यंत वेगळा आहे. सध्या तुम्ही सगळेजण इथे वेगळ्या विषयाबद्दल जास्त उत्सुक आहात हे मला माहिती आहे. तरीसुद्धा मी आपल्याला सांगू इच्छिते की, जशी वेळ येईल तशा गोष्टी तुम्हाला कळतीलच.”
‘भगवान बिरसा मुंडा संपूर्ण भारतीयांचे दैवत’ सुनेत्रा पवार यांनी दिवाळी आणि भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, “भगवान बिरसा मुंडा यांनी जल, जंगल आणि जमीन यांच्या रक्षणासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात दिलेले योगदान अतुलनीय आहे. ते केवळ जनजाती समाजाचेच नव्हे, तर संपूर्ण भारतीयांचे दैवत आहेत, म्हणूनच त्यांना ‘धरती आबा’ असेही संबोधले जाते. त्यांच्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर हा दिवस आपण ‘जनजाती गौरव दिन’ म्हणून साजरा करणार आहोत.” पुणे आणि बीडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन: पालकमंत्री म्हणून पुणे आणि बीड जिल्ह्यात होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देताना सुनेत्रा पवार म्हणाल्या: पुणे जिल्हा: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव कार्यालयाच्या वतीने शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरण, स्मारक स्वच्छता, दीपोत्सव, रानभाजी महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आरोग्य व पोषण जनजागृती शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, ‘पीएम जनमन योजने’ अंतर्गत १९६७ घरकुल देण्याचे उद्दिष्ट असून ८६३ भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून दिली आहे. बीड जिल्हा: वडवणी आणि शिरूर कासार तालुक्यांमध्ये आरोग्य शिबीर, स्वच्छता मोहीम आणि शासकीय कागदपत्रांचे सेवा शिबीर आयोजित केले आहे. १५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन एलईडीद्वारे आदिवासी बांधवांना ऐकवण्याचे नियोजन केले आहे. आदिवासी समाजासाठी ऐतिहासिक निर्णय: आदिवासी बांधवांसाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना त्या म्हणाल्या, “पुणे जिल्ह्यात कातकरी समाजाला मोठ्या प्रमाणावर जातीचे दाखले आणि रेशन कार्ड वितरीत केले आहेत. पवित्र पोर्टलद्वारे २५०० शिक्षकांची पारदर्शक भरती आणि ३००० कंत्राटी शिक्षक नियुक्त केले आहेत. आश्रमशाळांमध्ये पहिल्यांदाच परिचारिकांची (Nurses) नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय महिलांसाठी राणी दुर्गावती योजना आणि कोलाम, कातकरी समाजासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे.” ——————- हेही वाचा.. अजित पवारांचा अपघात नाही तर घातपातच: राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांचा खळबळजनक दावा, म्हणाले- माध्यमांत चर्चा नको, सखोल तपास व्हावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते उमेश पाटील यांनी एक अत्यंत खळबळजनक विधान केले असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार यांच्याबाबतीत घडलेला प्रकार हा अपघात नसून, तो घातपातच आहे, असे मला ठामपणे वाटते. मला असे का वाटते आणि कसे वाटते, यावर याआधीही बरीच चर्चा झाली आहे; परंतु हा अपघात नसून घातपातच आहे, अशी माझी प्रामाणिक मनोधारणा आहे, असे उमेश पाटील यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा
Source link