Headlines

‘काटेपूर्णा’त गतवर्षी 98 तर यंदा 12% साठा:गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात मोठी घट; अकोला शहरात पाणीबाणीची स्थिती




जिल्ह्यात यंदा पावसाने दगा दिल्याने भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. जिल्ह्यात यंदा केवळ ६० टक्के पाऊस झाला आहे. तब्बल ४० टक्के पावसाची मोठी तूट नोंदवली गेली आहे. परिणामी, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. अकोला शहराची तहान भागवणारा काटेपूर्णा प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरलाच नाही. या प्रकल्पात सध्या केवळ १२.७९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच कालावधीत प्रकल्पात तब्बल ९८.५९ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. यावरून यंदाच्या पावसाचे तीव्र दुर्भिक्ष स्पष्ट होते. काटेपूर्णा प्रकल्पात सध्या अवघा ११.४ दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण पाणीसाठा २२.२६ दलघमी आहे. जिल्ह्याची वार्षिक पावसाची सरासरी ६९३.७ मिलिमीटर आहे. यंदा प्रत्यक्षात केवळ ४१७.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. काटेपूर्णा प्रकल्प ज्या बार्शीटाकळी तालुक्यात अवघा ५५ टक्के पाऊस पडला. त्यामुळे प्रकल्पाच्या जलसाठ्यात कोणतीही भर पडू शकली नाही. उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणीटंचाईचे सावट नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच काटेपूर्णा प्रकल्पात अवघा १२.७९ टक्के उपयुक्त साठा शिल्लक राहिल्याने अकोला शहरावर आगामी उन्हाळ्यात अभूतपूर्व जलसंकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *