Headlines

संजय राऊतांनी वर्षा पाडण्यापेक्षा जनतेत जाऊन काम करावं:भांडूपच्या घरी मिठाईचा बॉक्स पाठवतो"; भाजप नेते नवनाथ बन यांचा सणसणीत टोला




शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत पलटवार केला आहे. “मुंबईत मराठी माणसाला हक्काची आणि परवडणारी घरे मिळत असल्याने संजय राऊत यांची पोटदुखी सुरू झाली आहे. वर्षा बंगला पाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांनी जनतेमध्ये जाऊन काम करावे,” असा टोला नवनाथ बन यांनी लगावला. सोमवारी (16 नोव्हेंबर) मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी बीडीडी चाळ व धारावी पुनर्विकास, पत्राचाळ घोटाळा, ‘वर्षा’वरील मिठाई वाटप, रोहित पवारांची पत्रकार परिषद आणि नताशा आव्हाड यांच्या भूमिकेवर जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत स्वतःसाठी नाही, तर मराठी माणसासाठी घरे बांधली बीडीडी चाळ आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) प्रकल्पांवरून संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला बन यांनी आकडेवारीसह प्रत्युत्तर दिले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आदित्य ठाकरे वरळीचे आमदार व मंत्री असताना आणि जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण मंत्री असताना बीडीडी चाळीतील घरांची किंमत 50 लाख रुपये ठेवण्यात आली होती, ज्यामुळे मराठी माणसाला वरळीतून परागंदा व्हावे लागले असते. मात्र, महायुती सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी तीच घरे अवघ्या 25 लाख रुपयांत मराठी माणसाला देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. पत्राचाळ घोटाळ्याची आठवण देवेंद्र फडणवीस आजही सरकारी बंगल्यात राहतात; त्यांनी तुमच्या मालकासारखे ‘मातोश्री 2’ बांधलेले नाही, असा टोला बन यांनी लगावला. ज्यांनी पत्राचाळ घोटाळ्यात कोट्यवधी रुपये लाटून मराठी माणसाला बेघर केले आणि 100 दिवस आर्थर रोड तुरुंगात काढले, तसेच ज्यांच्या सरकारमध्ये दरमहा 100 कोटी रुपयांची वसुली झाली, त्यांना मुख्यमंत्र्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका त्यांनी केली. तिसऱ्या प्राधिकरणाने नाक खुपसू नये मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या पत्राचा संदर्भ देत राऊतांनी केलेल्या आरोपांवर बन म्हणाले की, हा महापालिका आणि एसआरए या दोन शासकीय प्राधिकरणांमधील तांत्रिक समन्वयाचा विषय आहे. सरकार हा प्रश्न सोडवण्यास सक्षम असून ‘संजय राऊत’ नावाच्या तिसऱ्या प्राधिकरणाने त्यात नाक खुपसण्याची गरज नाही. संपादक म्हणून राऊतांच्या घरी मिठाईचा बॉक्स पाठवतो मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी पत्रकारांना दिलेल्या भेटवस्तूंवरून राऊतांनी केलेल्या आरोपांचा बन यांनी समाचार घेतला. दिवाळी स्नेहमिलनानिमित्त पत्रकारांना केवळ मिठाई देण्यात आली होती. संपादक असूनही आपल्याला मिठाई मिळाली नाही, हीच राऊतांची खरी पोटदुखी असावी. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नावाने मी स्वतः भांडूप येथील राऊतांच्या निवासस्थानी मिठाईचा एक बॉक्स पाठवून देतो, असा उपरोधिक टोला बन यांनी लगावला. तसेच, पत्रकारांना पाकिटे वाटण्याची आणि विरोधात लिहिणाऱ्या संपादकांना घरातून उचलून तळोजा तुरुंगात टाकण्याची परंपरा महाविकास आघाडीची होती, अशी आठवणही त्यांनी करून दिली. रोहित पवारांची ‘मफलर मॅन’वरून केवळ नौटंकी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेवर बोलताना बन यांनी त्यांच्यावर ‘नौटंकी’ करत असल्याचा आरोप केला. गेल्या महिन्यातही 10-15 तारखेला ते ‘मफलर मॅन’चा गौप्यस्फोट करणार होते, पण काहीच केले नाही. त्यांच्याकडे खरेच काही पुरावे असतील, तर त्यांनी ते चौकशी समिती आणि विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) द्यावेत; केवळ चर्चेत राहण्यासाठी हवेत बाण मारू नयेत. राजू शेट्टींच्या ऊस दर आंदोलनात रोहित पवार सहभागी होत नाहीत, कारण त्यांचे स्वतःचे साखर कारखाने आहेत आणि शेतकऱ्यांना जास्त भाव द्यावा लागेल याची त्यांना भीती वाटते, असा आरोपही बन यांनी केला. नताशा आव्हाड आणि मुंब्र्याच्या राजकारणावर भाष्य मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना नवनाथ बन यांनी खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला आरक्षणाला दिलेल्या पाठिंब्याचे स्वागत केले. मात्र, जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड यांनी घेतलेल्या विरोधी भूमिकेवर त्यांनी टीका केली. जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि त्या मतदारसंघातील वातावरणाचा दुर्दैवी प्रभाव त्यांच्या कुटुंबावर पडला आहे. महिला आरक्षण लागू झाल्यास नताशा आव्हाड यांच्यासह अनेक तरुणींना विधानसभेत जाण्याची संधी मिळू शकते; तरीही केवळ आपल्या मतदारांना खूश करण्यासाठी आव्हाड कुटुंबाकडून अशी भूमिका घेतली जात असावी, असे बन म्हणाले. ——————————————————— हेही वाचा… वडेट्टीवारांना खासगीत विचारलं तर तेही म्हणतील मतदारसंघ पुनर्रचना झालीच पाहिजे: चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला; आदिवासी शेतकऱ्यांसाठी मोठ्या निर्णयाची घोषणा मतदारसंघ पुनर्रचनेच्या (डीलिमिटेशन) मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकीय वादात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. “विजय वडेट्टीवार किंवा नाना पटोले यांना खासगीत विचारले, तर तेही सांगतील की विकासासाठी मतदारसंघांची पुनर्रचना झालीच पाहिजे. मात्र, त्यांचे नेते राहुल गांधी फटकारतील या भीतीने ते उघडपणे बोलत नाहीत,” असा सणसणीत टोला बावनकुळे यांनी लगावला आहे. सोमवारी (16 नोव्हेंबर) माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मतदारसंघ पुनर्रचना, आदिवासी शेतकऱ्यांना मालकी हक्काचा ‘सात-बारा ही’ देण्याची मोहीम, 15 लाख शेतकऱ्यांना फार्मर आयडी, दुष्काळ निवारण आणि हिवाळी अधिवेशनातील काटकसर यांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर भाष्य केले. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *