![]()
तालुक्यातील देऊळगाव बाजार येथील अल्पभूधारक शेतकरी त्र्यंबक जगन्नाथ पंडित (६२) यांनी कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याने कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सिल्लोड ग्रामीण पोलिस ठ
.
मिळालेल्या माहितीनुसार, केवळ दोन एकर शेती असलेले त्र्यंबक पंडित हे विविध कार्यकारी सोसायटी आणि ग्रामीण बँकेच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले होते. मागील आठवड्यात गावात कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी लावण्यात आली होती.
दोन वेळा प्रसिद्ध झालेल्या यादीतही आपले नाव न आल्याने ते नैराश्यात होते. कर्जाची परतफेड कशी करावी या चिंतेतून त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. हा प्रकार नातेवाईकांच्या निदर्शनास येताच त्यांना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. मृत त्र्यंबक पंडित यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस अंमलदार विकास लोखंडे करत आहेत.