![]()
दिवसभर शेतात कष्ट करून बैलगाडीने घराकडे परतणाऱ्या एका वृद्ध शेतकऱ्यावर काळाने घाला घातला. नांदुरा-मोताळामार्गावर लोनवडी गावाजवळ भरधाव कारने बैलगाडीला जोरदार धडक दिली. यात 70 वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यूझाला. ही घटना बुधवार, 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजता घडली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की बैलगाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याला जुंपलेले दोन्ही बैल गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वासुदेव तुळशीराम कुटे (वय अंदाजे 70, रा. लोनवडी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. वासुदेव कुटे हे नेहमीप्रमाणे शेतातील कामे पूर्ण करून बैलगाडीने गावाकडे निघाले होते.लोनवडी गावाजवळ पोहोचले असताना नांदुऱ्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ब्रेझा कार (क्रमांक एमएच 34 बीआर7555) वरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. सदर वाहनाने वासुदेव यांच्या बैलगाडीला जोरदार धडक दिली.या अपघातात बैलगाडीचा अक्षरशः चुराडा झाला. गंभीर मार लागल्याने वासुदेव कुटे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची वार्ता समजताच नांदुरा येथील ओमसाई फाउंडेशनची रुग्णवाहिका स्वयंसेवकांसह तातडीने घटनास्थळी पोहोचली. विलास निबोळकर, बळीराम गोड, प्रमोद वरदे, संजय चोपडे, साहेबराव फासे आणि इतर स्वयंसेवकांनी मदतकार्य सुरू केले. त्यांच्यासहकार्याने मृतदेह नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आला. दरम्यान,अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही बैलांची प्रकृती चिंताजनक आहे. पशुप्रेमी आणि ग्रामस्थांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. शेतातील दिवसभराचे कष्टसंपवून घराकडे परतणाऱ्या वासुदेव कुटे यांचा प्रवास अशाप्रकारे मृत्यूने संपला. त्यामुळे लोनवडी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे. क्षणभराच्या अपघाताने एकाकुटुंबाचा आधार हिरावला गेल्याची भावना परिसरातून व्यक्त केली जात आहे.
Source link
शेतातून परतणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याच्या बैलगाडीला भरधाव कारची धडक:नांदुरा-मोताळा मार्गावर दुर्घटना; दोन्ही बैल गंभीर, शेतकरी ठार